Hrithik-Saba : सबासाठी हृतिकने फॅन्सना मारला धक्का (Video)

Hrithik-Saba
Hrithik-Saba

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik-Saba) त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. सध्या तो अभिनेत्री सबा आझादला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, आम्ही दोघे मित्र असल्याचे त्याने सांगितले होते. आता दोघे पुन्हा कॅमेराबध्द झाले आहेत. दोघे नुकतेच एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाले होते. पण यावेळी असे काही घडले की, ते नेटकऱ्यांना अजिबात आवडले नाही. एका युजरने लिहिले, 'या लोकांमुळे तुम्ही येथे आहात हे विसरू नका…!' दुसऱ्या एका युजरने असेही लिहिले की, साऊथ स्टार्सकडून काहीतरी शिका. (Hrithik-Saba)

डिनरनंतर हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद रेस्टॉरंटमधून बाहेर आले. तो आपल्या कारच्या दिशेने जात असताना काही चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची विनंती करण्यास सुरुवात केली. सबा आरामात कारमध्ये बसू शकेल आणि तिला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हृतिक त्याच्या चाहत्यांना हाताने धक्का देत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

आता हृतिक रोशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्याची ही वृत्ती चाहत्यांना अजिबात आवडलेली नाही. एका युजरने लिहिले की, 'शेम हृतिक! तू नम्रपणे नकार देऊ शकला असतास… लोकांना असे ढकलून देऊ नका… लोक आता साऊथ स्टार्सच्या मागे वेडे झाले आहेत… त्यांच्याकडून शिका.' दुसर्‍याने कमेंट केली की, 'बॉलिवूडच्या फालतू लोकांची फालतू वृत्ती. नेपोटिझम प्रोडक्ट्स.

२० डिसेंबर, २००० रोजी हृतिकने सुझान खानशी लग्न केले होते. दोघे हिंदू-मुस्लिम पद्धतीने विवाहबध्द झाले. दोघांना रिदान आणि रेहान ही दोन मुले आहेत. २०१३ मध्ये हृतिक आणि सुझैन वेगळे झाले आणि २०१४ मध्ये घटस्फोट घेतला. मात्र, दोघेही नेहमीच मित्र म्हणून एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आणि मुलांचे संगोपन करत आहेत. सुझान सध्या अर्सलान गोनीला डेट करत असताना, सबानेही हृतिकच्या आयुष्यात प्रवेश केला आहे.

हृतिक रोशनचा आगामी चित्रपट

हृतिक रोशन अनिल कपूर आणि दीपिका पदुकोण सोबत 'फायटर' मध्ये दिसणार आहे. दीपिका आणि हृतिक पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हे दोन्ही स्टार्स बॉलीवूडमधील नंबर वन कलाकारांपैकी एक आहेत. अशा परिस्थितीत त्यांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.

video – manav.manglani insta वरून साभार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news