पुढारी ऑनलाईन : बहुचर्चित 'लालसिंह चड्ढा' या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने आमीर खान खूपच निराश झाला होता. चित्रपटाचे टीझर रीलिज झाल्यापासून सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू होती आणि याचाच फटका चित्रपटाला बसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमीर अनेक कार्यक्रमांना जाणे टाळत होता. त्यापूर्वी मुंबईमध्ये आमीर स्पॉट झाला होता. त्यावेळी थकलेला चेहरा आणि पांढरी दाढी पाहून आमीरचे चाहते चिंतेमध्ये पडले होते. 'लालसिंह चड्ढा' च्या रीलिजनंतर पहिल्यांदाच आमीर सुट्टी घालवण्यासाठी जाताना दिसला. सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामध्ये आमीर फीफा वर्ल्ड कपमध्ये मॅच बघण्यासाठी गेल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ लुसैल स्टेडियम बाहेरचा आहे.