पुढारी ऑनलाईन डेस्क
आज बहुतांश अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये ड्युअल-सीम सपोर्ट आहे. यामुळे युजर्संना एकाच डिव्हाइसवर दोन वेगवेगळे नंबर वापरण्याची सुविधा आहे. तसेच तुम्ही आता एकाच स्मार्टफोनवर WhatsApp ची दोन अकाउंट वापरु शकता. Xiaomi, Samsung, Vivo, Oppo, Huawei आणि Honor सारख्या कंपन्या आता 'ड्युअल ॲप्स' किंवा 'ड्युअल मोड' फीचर ऑफर करत आहेत. ज्यामुळे युजर्संना एकाच चॅट ॲपची दोन वेगळी अकाउंट वापरता येतात. याचा अर्थ असा की, तुम्हाला दोन व्हॉटस ॲप अकाउंट्साठी दोन स्मार्टफोन्सची गरज नाही; पण हे कसे वापरावे ते आपण पाहुया…
सॅमसंग (Samsung) : Dual Messenger
शाओमी Xiaomi (MIUI) : Dual apps
Settings > Dual Apps
व्हिवो Vivo : App clone
Settings > App clone
ओपो Oppo : Clone Apps
Settings > Clone Apps
काही फोन असे आहेत जे Android One डिव्हाइसेस आणि जे 'stock' Android ऑफर करतात; पण ते ड्युअल ॲप फिचर्ससह येत नाहीत. यासाठी Google Play Store गुगल प्ले स्टोअरवर Parallel, Dual App Wizard, DoubleApp असे आणखी काही बरंच ॲप्स उपलब्ध आहेत. युजर्स ती ॲप्स डाउनलोड करुन एकाच स्मार्टफोनवर एकाच चॅट ॲपची दोन अकाउंट वापरु शकतात.
हेही वाचलं का?