sweat pimples : उन्हाळ्यात घामोळ्यामुळे त्रस्त आहात; घरीच करा ‘हे’ उपाय

sweat pimples
sweat pimples

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिवाळा संपला असून कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. कडक उन्हाळा म्हटलं की, एकीकडे प्रत्येकाची कामाची धावपळ तर दुसरीकडे उन्हाळ्याच्या समस्येसोबत घामाच्या धारा वाहतात. मग सामान्यत: शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अनेक थंडगार पदार्थाकडे कल वाढतो. दरम्यान, काही नागरिकांना उष्णतेचा तर काहींना घामोळ्यांचा त्रास होतो. कडक उन्हाळात घाम, पिंपल्स, पुरळ, घामोळ्या यांसारख्या समस्या भेडसावतात. बाळापासून ते मोठ्यापर्यत सर्वांनाचा घामोळ्याचा त्रास होतो. यावर घरच्याघरी काही उपाय केल्यास शरीराला आराम मिळेल. ( sweat pimples )

कडूलिंब

कडूलिंबाची पाने आणून त्याची मिक्सरमधून पेस्ट तयार करून घामोळ्यांना लावावी. कडूलिंबाच्या पानांनी सकाळ – संध्याकाळ गरम पाण्यात घालून आंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास कमी होतो.

कोरफड

कोरफडीचा गर काढून घामोळ्या उठलेल्या जागी लावल्यास होणारी जळजळ कमी होण्यास मदत होते. कोरफड जेल आणि एलोवेरा जेल समप्रमाणात घेवून घामोळ्या आलेल्या जागेवर लावल्यास शरीराला आराम मिळतो. ही पेस्ट झोपताना लावून सकाळी स्वच्छ पाण्याने धुवावे, असे केल्यास घामोळ्याचा त्रास कमी होतो.

काकडी

उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाणे खूपच फायदेशीर असते. एक ग्लास पाण्यात ४-५ काकडीचे काप आणि लिंबाचा रस (अर्धा लिंबू) घालून ते भिजत ठेवावे. यानंतर हे पाणी घामोळ्या आलेल्या ठिकाणी लावून हळूहळू मालिश करावे. असे केल्याने शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी होवून घामोळ्या किंवा पुरळ कमी होण्यास मदत होते. हा आजीबाईंच्या बटव्यातील उपाय करायला हरकत नाही.

बर्फ

शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढल्यास घामोळ्या आणि पुरळ येतात. एका ग्लासमध्ये थंडगार बर्फ आणि थोडे पाणी घ्या. आणि कॉटनच्या कापड त्या पाण्यात बुडवून थंड झाल्यावर घामोळ्या उटलेल्या जागी लावावे. असे केल्याने ती जागा थंडगार होवून शरीराला आराम मिळतो.

मुलतानी माती

मुलतानी माती आणि गुलाब पाणी समप्रमाणात घेवून घामोळ्या उटलेल्या जागेवर लावावे. हा लेप सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकावा. तर पुदिना, मुलतानी माती आणि थंड दूध याची पेस्ट करुन लावल्याने घामोळ्यांचा त्रास कमी होतो.

खोबरेल तेल

खोबरेल तेलात २-३ कापूर मिसळा आणि या तेलाने शरीराला मसाज करावे. असे केल्याने घामोळ्यांपासून आराम मिळतो, हा देखील आजीबाईंच्या बटव्यातील उपाय करायला हरकत नाही.

दही, ताक आणि कोंल्ड्रिक्स

उन्हाळ्यात हमखास दही, ताक, कोंल्ड्रिक्स, गार पाणी या शीतपेयाचा वापर करतो. यामुळेही शरीरातील उष्णता कमी होवून घामोळ्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते.

चंदन पावडर

चंदनमध्ये शीतल गुण असतात. चंदन आणि धने पावडर समप्रमाणात घेवून त्याच गुलाब जेल टाकून पोस्ट बनवा. ही पेस्ट घामोळ्या आलेल्या ठिकाणी हाताने लावा आणि थोड्या वेळाने स्वच्छ पाण्याने धुवून टाका. असे केल्याने घामोळ्यापासून होणारी जळजळ कमी होण्यास मदत होते. ( sweat pimples )

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news