Hair dandruff : केसांतील कोंडा जात नाही? मग 'हे' करा उपाय | पुढारी

Hair dandruff : केसांतील कोंडा जात नाही? मग 'हे' करा उपाय

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिलांसोबत पुरुषांच्याही डोक्यात कोंड्याची समस्या उद्भवत असते. यामुळे केस तुटण्याची किंवा गळण्याची समस्या वाढते. काही वेळी तर कोंड्यामुळे विपरित परिणाम होऊन खाज सुटते. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावी लागतात. मात्र, ही समस्या घरच्या घरी बरी करण्यासाठी घरगुती उपाय केल्यास होणारा पुढील मोठा धोका टळण्यास मदत होते. यामुळे कमी खर्चात आणि कमी उपयात केसांतील कोंड्याची समस्या कशी कमी करता येईल हे जाणून घेऊयात… ( Hair dandruff )

कडुलिबांचे फायदे वाचाल तर रोजच उपयोग कराल, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून होईल बचाव - Marathi News | health benefits of neem | Latest health News at Lokmat.com

कडूलिंब

कडूलिंबाच्या पानात नैसर्गिक बुरशीनाशक आणि जतूंनाशक गुणधर्म असतात. यामुळे कडूलिंबाची पाने बारीक करून ती दह्यात मिसळून केंसाना लावल्यास केसांतील कोडा कमी होण्यात मदत होते. यामुळे हा उपाय आडवड्यातून दोन वेळा तरी करून पाहा नक्कीच फरक पडतो.

कोरफड Vera रोपाची वाढ आणि काळजी कशी घ्यावी? | Housing News

कोरफड (एलोवेरा)

कोरफड अनेक समस्यावर गुणकारी आहे. त्वचेपासून ते केसांच्या अनेक समस्यांवर कोरफड हा रामबाण उपाय आहे. कोरफड हे एलोवेरा नावाने प्रसिद्ध आहे. एलोवेरा जेल किंवा कोरफडीचा गर केसांना हलक्या हातांनी लावून २०-२५ मिनिटे ठेवा. यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. असे आठवड्यातून दोन- तीन वेळा केल्यास केसांतील कोडा कमी होण्यास मदत होते. याशिवाय केसांना एक प्रकारची चमक येते.

Lemon Price Hike: नींबू को लगी महंगाई की 'नजर, 300 रुपये प्रति किलो तक पहुंचे दाम - Lemon Price Hike lemon price reached near three hundred rupees in Dehradun

लिंबाचा रस

दोन चमचा खोबरेल तेलात अर्धा चमचा लिंबाचा रस घालून डोक्यातील केसांच्या मुळानां लावावे. यानंतर १ तासानंतर केस शॅम्पूने धुवून टाकावेत. आठवड्यातील दोन वेळा असे केल्यास डोक्यातील कोंडा कमी होण्यास मदत होते आणि केस काळे होतात.

मेथी खाण्याचे ९ मोठे फायदे | हेल्थ News in Marathi

मेथीच्या बिया

पहिल्यांदा मेथीच्या बिया बारीक वाटून घ्याव्यात. वाटलेल्या बिया दोन कप पाण्यात रात्रभर भिजत ठेवाव्यात. सकाळी त्यांची पेस्ट करून हलक्या हातांनी केसांच्या मुळांंना लावावी. हलक्या हातांनी मालिश करावे आणि २० मिनिटांनी केस धुवून टाकावेत. असे केल्यास केंसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.

कापूर

खोबरेल तेल गरम करून त्यात कापूर घालावा. ते थंड झाल्यावंर केसांच्या मुळांना लावावे. यानंतर अर्ध्या तासाने कोमट पाण्याने केस धुवावे. यामुळे केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होते.

दही

केसांच्या मुळांना दही लावावे आणि ३० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाकावे, यामुळे केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होते.

सायडर व्हिनेगर

एका भांड्यात अॅपल सायडर व्हिनेगर आणि लिंबाचा रस दोन चमचे घ्या. या मिश्रणाच्या दुपप्ट पाणी घालून तयार मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरा. यानंतर केसांना लावून २० मिनिटानंतर केस धुवा. असे केल्यास केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होते. यामुळे घरच्या घरी हे उपाय करून केसांतील कोंडा पळवून लावा. ( Hair dandruff )

हेही वाचा : 

Back to top button