Protect From Heat : उन्हाळ्यात शरीराला द्या थंडावा

Summer
Summer
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऐन उन्हाळ्यात, फिट राहण्यासाठी आणि गरमीचे चटके कमी करण्यासाठी काय उपाय आहेत? आपली प्रतिकारशक्ती टिकून राहावी, आजारी पडू नये, यासाठी आपण घरच्या घरी काय उपाय करावेत? यासाठी अगदी सोपे उपाय आम्ही तुम्हाला देत आहोत. (Protect From Heat ) उन्हाळ्यात जे कामासाठी बाहेर फिरतात वा फिल्ड वर्कवर असतात; त्यांना विशेषत: अधिक काळजी घ्यायला हवी. काही जणांना तर उन्हातून आल्यानंतर डोकं दुखायला लागतं. तसेच अनेकांना ऊन सहन होत नाही. अशावेळी उष्णता वाढणे, डोळे रखरखणे, जेवण कमी जाणे, अधिक झोप येणे, मळमळ आणि चक्कर येणे, थकवा, अशक्तपणा येणे यासारखे प्रकार होतात. या पुढील टिप्स वापरून तुम्ही उन्हाळ्यातदेखील फिट आणि फ्रेश राहू शकता. (Protect From Heat )

अनावश्यक उन्हात जाणे टाळणे – अनावश्यक उन्हात जाणे टाळावे. काही महत्त्वाचे काम असेल तरचं दिवसा बाहेर पडावे.

उन्हापासून संरक्षण – उन्हात बाहेर पडल्यानंतर टोपी घालावी. स्कार्फ बांधावे, छत्रीही उत्तम पर्याय आहे. यामुळे उन्हापासून संरक्षण होईल. काही जणांना घाम येऊन अंगावर ॲलर्जी होते, जसे की पुरळ येणे, लाल चट्टे उठणे. उन्हापासून बचावासाठी या गोष्टा केल्यास असे प्रकार होणार नाहीत.

सैलसर कपडे घालणे – उन्हाळ्यात घट्ट कपडे वापरू नये. घट्ट कपडे वापरल्यास घाम येऊन अंगावर रॅशेस येतात. सुती कपडे वापरणे कधीही चांगले. त्यामुळे अंगातील घाम शोषला जातो. मऊ आणि सुती कपड्यांमुळे उष्णतेचा दाह अधिक होत नाही.

सनग्लासेस वापरा – बाहेर जाताना सनग्लासेस, गॉगल वापरणे. त्याचबरोबर, दिवसांतून तीन ते चार वेळा डोळ्यांवर गार पाणी मारणे. डोळ्यांना गारवा मिळण्यासाठी हे रोज करणे आवश्यक आहे. काकडीचे गोल काप कापून ते डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना गारवा तर मिळतोच शिवाय काळी वर्तुऴे निघून जाण्यास मदत होते.

त्वचेची काळजी घ्या – रखरखत्या उन्हात सन्सक्रीम वापरणे खूप महत्त्वाचे आहे. काहींना उन्हात गेल्यानंतर टॅनिंग होते किंवा चेहरा काळवंडतो. अशा वेळी बाहेर पडताना सनस्क्रीम लावणे गरजेचे आहे. टॅनिग घालवण्यासाठी दही, लिंबू, बेसन पीठ, हळद, कोरफड, दूध, मसूर डाळीचं पीठ तसेच स्क्रबरही वापरता येते. त्याचबरोबर, मुलतान माती, चंदन पावडरचा मास्कचाही उपयोग करता येतो. दिवसांतून तीन-चार वेळा चेहरा धुतल्यास धूळ, पिंग्मिंटेशन, पुरळपासून सुटका होण्यास मदत होते. (Protection From Sun)

थकवा घालवण्यासाठी – तापमानाचा पारा वाढला की, घामाच्या धारा लागतात. अशक्तपणाही जाणवतो. कधी-कधी इतका थकवा येतो की, काम करण्यासाठी अंगात त्राण राहत नाही. यासाठी पूर्ण झोप आणि योग्य, सकस आहार घेणं महत्त्वाचं आहे.

योग्य आहार – उन्हाळ्यात उष्णता वाढवणारे पदार्थ कमी खावेत. जसे की चिकन, अंडी, पपई वगैरे. शाकाहारी पदार्थांवर भर द्यावा. पचायला जड असणारे पदार्थ टाळावेत. द्रव्ययुक्त पदार्थ लिंबू सरबत, कोकम, आवळा सरबत, ज्यूस प्यावे. फळे खावीत. पाण्याचे प्रमाण अधिक असलेली फळे कलिंगड वगैरे खावीत. काकडी, बीट, टोमॅटो यावर भर द्यावा. दही, ताक, मठ्ठा, नाचण्याची आंबील प्यावी. भरपूर पाणी प्यावे. परंतु, अतिथंड पाणी पिणे टाळावे. मातीच्या माठातले पाणी पिणे कधीही चांगले.

पुरेशी झोप – उन्हाळ्यात आपल्या दिनचर्येत बदल करावा. पुरेशी झोप घ्यावी. गर्मी होते म्हणून रात्री उशीरापर्यंत झोप लागत नाही. पुन्हा सकाळी कामावर जाताना किंवा लवकर उठताना त्रास होतो. शिवाय झोप न झाल्यास दिवसभर कंटाळा येतो. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे.

व्यायाम – सकाळी उठून किमान अर्धा तास चालावे. बैठे काम करणाऱ्यांनी तर चालणे महत्त्वाचं आहे. घरात असो किंवा कामाच्या ठिकाणी-सलग १ तास १ तास एका जागी बसू नये. मधून मधून उठावे. थोडं चालावं. सकाळच्या वेळेला सूर्यनमस्कार घालावे, योगासने करावीत अथवा ॲरोबिक्स केलं तरी चालेल.

पाणी भरपूर प्या – प्रतीकारशक्तीसाठी घरगुती काढाही करता येतो. सी व्हिटॅमीन असणारी फळे खावीत. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे. तुळशीच्या पानांच रस, आवळ्याचा रस तसेच वनौषधी काढा घेऊन तुम्ही प्रतीकारशक्ती वाढवू शकता. उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती वाढावी आणि आजारी पडू नये म्हणून दिवसांतून दोन वेळा आंघोळ करणेही गरजेचं आहे. थंड पाण्याने आंघोळ केल्यास उष्णतेचा दाह कमी होतोचं शिवाय फ्रेश देखील वाटते.

रखरखत्या कडक उन्हाळ्यात थंडगार होण्यासाठीच्या या टिप्स तुम्हाला नक्कीचं उपयोगी पडतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news