नगर : रेल्वे उड्डाणपुलावर टॅ्रक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू

नगर : मनमाड बायपास रोडकडून कल्याण रोडकडे जाताना रेल्वे उड्डाणपुलावर ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. याबाबत तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवीदास बाळासाहेब बारहाते (रा.जायगुडे आखाडा, टाकळीभान, ता.श्रीरामपूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ट्रॅक्टर चालकाने बारहाते यांच्या दुचाकीला कट मारल्याने ट्रॉलीच्या मागील चाकाला धडकून त्यांना गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पसार झाला असून, तपास करीत आहेत.