Mutton Keema Samosa : घरच्या घरी बनवा गरमागरम मटण कीमा समोसा

Mutton Keema Samosa
Mutton Keema Samosa

पुढारी ऑनलाईन डेस्क : समोसा तर तुम्ही खूपदा खाल्ला असाल. पण तुम्ही मटण कीमाचे समोसे खाल्ले आहेत का? कीम्याच्या समोशाची चव टेस्टी असते. आपण अधिकतर हॉटेल, बेकरीमध्ये समोसे पाहतो. (Mutton Keema Samosa ) पण काही लोक कीमा समोशा खाण्याचे शौकीन असतात. समोसे तयार करण्यासाठी मटन कीमा आणि काही मसाल्यांचा उपयोग केला जातो. (Mutton Keema Samosa)

कीमा समोसा बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. ही रेसिपी बनवण्यासाठी जे साहित्य लागते, तेदेखील खूप कमी लागते. जर ही रेसिपी घरी बनवली तर मुलेही खूप आवडीने खातील. कीमे समोसा पिकनिक वा बाहेर फिरायला जाताना सोबत घेऊन जाऊ शकतो. सकाळी नाश्तालादेखील खाऊ शकतो.

साहित्य:

मटण कीमा समोसा रेसिपी

मटण कीमा

मध्यम चिरलेले ४ कांदे

तेल तळण्यासाठी

धने पावडर

लाल तिखट १ चमचा

मीठ

हळद

गरम मसाला 2 छोटे चम्मच

जीरा पावडर १ छोटा चम्मच

कृती :

सर्वात आधी मटन कीमा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आता कुकरमध्ये मटन कीमा आणि एक गिलास पानी घालून १० मिनिटे शिजवून घ्या

एका पॅनमध्ये गरम तेल टाकून त्यात चिरलेला कांदा २ मिनिटांसाठी परतून घ्या. त्यात लाल तिखट, हळद घालून हलवून घ्या. आता यात मटण कीमा घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा. वरून जीरा पाउडर, धने पावडर, मीठ, गरम मसाला, कोथिंबीर घालून शिजवून घ्या. हा कीमा समोसे (Keeme Ke Samose) चा मसाला तयार झाला.

आता मैदा किंवा गव्हाचे पीठ गेऊन ते घट्ट मळून घ्या. चौकोनी पोळी लाटून त्यात हा मसाला भरा आणि समोशाचा आकार देऊन मैद्याच्या पेस्टने तो चिकटवून घ्या. असे समोसे मसाला भरून तयार करून ठेवा.

एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. त्यात २ किंवा ३ समोसे घालून तळून घ्या. ब्राऊन कलर होऊपर्यंत समोसे तळून घ्या. गरमा गरम समोसे प्लेटमध्ये सजवून सोबत टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा पुदिना चटणीसोबत खायला घ्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news