Moong Dal Toast : मुले डबा खात नाहीत? मग झटपट बनवून द्या ‘मूग डाळ टोस्ट’

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन : मुलांची शाळा सुरु झाल्यापासून आईला मुलांना डबा काय करून द्यायचा असा प्रश्न नक्कीच पडत असणार. (Moong Dal Toast) जरी मुलांना पोळी भाजी डब्यातून करून दिली तरी मुले डबा एकतरी निम्मा खातात किंवा परत आणतात. अशावेळी मुलांना काहीतरी वेगळा चटपटीत पदार्थ करून दिला तर? मग वाट कसली पाहताय! मुलांसाठी मूग डाळ टोस्ट नक्की बनवून द्या. ही रेसिपी करायला सोपी आणि हेल्दी आहे. रेसिपी करायला वेळही फार जात नाही.  (Moong Dal Toast)

साहित्य –

कोथिंबीर बारीक चिरून

तूप किंवा लोणी / बटर

मूग डाळ भिजवलेली

व्हाईट ब्रेड

टोमॅटो सॉस

हळद

तिखट

गरम मसाला

तेल

कृती –

मूग डाळ घेऊन रात्रभर भिजत ठेवा. सकाळी पाणी गाळून मिक्सरमध्ये त्याचे वाटण करून घ्या. आता एक पॅन किंवा तवा गॅसवर ठेवून गरम करून घ्या. दुसरीकडे मिक्सरमध्ये केलेले वाटण एका भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, गरम मसाला, तिखट, कोथिंबीर बारीक चिरून घालावे. हे वाटण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या. व्हाईट ब्रेड घेऊन त्यावर तूप किंवा लोणी किंवा बटर लावून घ्या. आता मुगाच्या वाटणमध्ये ब्रेड बुडवून घ्या. तापलेल्या पॅनमध्ये थोडे तेल सोडून गरम करून घ्या. ब्रेड गरम तेलावर परतवून घ्या. सोनेरी रंग येऊपर्यंत ब्रेड भाजून घ्या.

गरमा गरम मूग डाळ टोस्ट टोमॅटो सॉससोबत खायला घ्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news