Sweet Corn makai Salad : नेहमीपेक्षा हटके, घरी बनवा स्वीट मकई सॅलड | पुढारी

Sweet Corn makai Salad : नेहमीपेक्षा हटके, घरी बनवा स्वीट मकई सॅलड

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेहमी आपण घरात गाजर-काकडीची कोशिंबीर बनवतो. दहीमध्ये घालून बनवलेले सॅलड किंवा कोशिंबीर घरातल्या सर्वच मंडळींना आवडेल असे नाही. (Sweet Corn makai Salad ) मग, तुम्ही कधी स्वीट मकई सॅलड करून पाहिले आहे का? बाजारात तर स्वीट कॉर्न सहज उपलब्ध होतात. याच स्वीट कॉर्नपासून मकई सॅलड बनवता येते. नेहमीपेक्षा काही हटके, चविष्ट, हेल्दी आणि मुलांनाही आवडेल, अशी ही रेसिपी आहे. तर मग करताय ना स्वीट मकई सॅलड… (Sweet Corn makai Salad )

साहित्य:

स्वीट कॉर्नचे दाणे

एक टोमॅटो बारीक चिरलेला

१ बारीक कांदा चिरलेला

एक खिसलेले गाजर

१ कप काकडी बारीक चिरलेली

कोथिंबीर

१ तुकडा हिरवी मिरची बारीक चिरलेली

चाट मसाला

साखर थोडी

मीठ चवीनुसार

लिंबूचा रस

मकई सॅलड बनवण्याची कृती –

२ कप पाणी घेऊन स्वीट कॉर्न ५ मिनिटे उकडून घ्या. मऊ झाले की त्यातील पाणी काढून दाणे बाजूला ठेवून द्या. स्वीट कॉर्न थंड होऊ द्या. आता एका मोठ्या भांड्यात किंवा वाटीमध्ये हे दाणे घेऊन त्यात बारीक चिरलेला कादा, टोमॅटो, गाजर, काकडी, कोथिंबीर, हिरवी मिरची घालून मिक्स करून घ्या. आता त्यात चाट मसाला, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, लिंबूचा रस घालून मिश्रण करून घ्या. हे मिश्रण तयार करून तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता.

Back to top button