Mattha Recipe : मसालेदार मठ्ठा खूपचं उपयोगी, होतील ‘हे’ फायदे

मसालेदार मट्टा
मसालेदार मट्टा

पुढारी ऑनलाईन डेस्क : असह्य उन्हात काहीतरी गारेगार खावेसे-प्यावेसे वाटते. मनाला तृप्ती देणारी ही मसालेदार मठ्ठा रेसिपी तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल. उन्हाळा सुरू झाला की, अंगाची लाहीलाही होते. मग आपण, सरबत, ज्यूस, आईस्क्रीम, बर्फावर जोर देतो. (Mattha Recipe) कोल्ड्रिंक्स तर पिणे नेमाने आलेच. पण, कधी-कधी अतिथंड पदार्थामुळे घशाला सूज येणे, घसा खवखवणे, सर्दी होणे, उष्णता वाढणे यासारखे प्रकार होऊ लागतात. पण, तुम्ही मसालेदार मठ्ठा प्यायला तर तुम्हाला त्याचे आरोग्यदायी फायदे मिळतील. जर मठ्ठा मटक्यातील असेल तर मग, व्वा! क्या बात है! (Mattha Recipe)

आपण उन्हाळ्यात घरात सर्रास दही वापरतोच. ताजे ताजे दही असेल तर साखर-दही, ताक बनवले जाते. तर आंबट दही असेल तर ताकाची कढी बनवली जाते. आता याचं दह्यापासून तुम्ही मसालेदार मठ्ठा बनवू शकता. जे मनाला तृप्ती देणारे असेल आणि फायदेशीरही. अंगाची लाही थांबण्यासाठी जरूर मसालेदार मठ्ठा घरीच तयार करा.

ताक (Taak)
ताक (Taak)

साहित्य –

दही – गरजेनुसार

साखर – चवीनुसार

मीठ -चवीनुसार

जिरेपूड-१ चमचा

धने पावडर – अर्धा चमचा

कोथिंबीर

पुदिना – आवडीनुसार

हिंग – चिमूटभर

लसूण- ४-५ पाकळ्या

कृती-

दही रवीने किंवा मिक्सरमध्ये घुसळून घ्या. एका मोठ्या भांड्यात दही काढून घ्या. त्यामध्ये हवं तेवढं घट्ट किंवा पातळ होण्यासाठी पाणी घाला. थंड पाणी टाकले तरी चालेल. वरून मीठ, साखर, मीठ, लसुण (बारीक केलेले), कोथिंबीर, पुदिना , हिंग टाका. सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव होऊ द्या. किंवा हे मिश्रण मिक्सरवरदेखील फिरवून घेऊ शकता. वरून चवीनुसार, जिरेपूड टाका. मस्त मसालेदार मठ्ठा तयार आहे.

ताक शरीराला थंडावा देते. वजन कमी करण्यासाठी तर हे रेसिपी उत्तम आहे. मठ्ठा प्यायल्यास पोट भरल्यासारखे वाटते. पचनासाठी ते उत्तम आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news