Kothimbir Vadi Reciepe : पावसाळ्यात बनवा गरमागरम खमंग तिखट कोथिंबीर वडी

Kothimbir Vadi
Kothimbir Vadi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पावसाळ्यात काहीतरी गरमागरम खावेसे वाटते. (Kothimbir Vadi Reciepe ) खमंग तिखट कोथिंबीरची वडी खायला मिळाली तर क्या बात है! कमी वेळेत सहज सोपी असणारी ही रेसिपी जरा हटके आहे. पण सर्वचजण खातील, इतकी चविष्ट आहे. खमंग तिखट कोथिंबीर वडी कशी बनवायची हे जाणून घ्या. (Kothimbir Vadi Reciepe)

साहित्य-

बेसन पीठ (झुणक्याचे पीठ) – एक मोठा कप

कोथिंबीर – एक पेंडी

तांदुळ पीठ – एक वाटी

पांढरे तीळ – एक चमचा

जिरे – १ चमचा

हळद- १ चमचा

मीठ-चवीनुसार

पाणी

लाल तिखट

तेल – तळण्यासाठी

आलं-लसुण पेस्ट

हिरव्या मिरच्या

file photo
file photo

कृती –

प्रथम कोथिंबीर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. ती बारीक चिरून घ्या. आता एका मोठ्या बाऊलमध्ये कोथिंबीर, एक मोठा कप बेसन घाला. त्यात १ वाटी तांदळाचे पीठ घाला. आता मिक्सरमध्ये आले, लसुण, हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ एकत्र करून मिश्रण करून घ्या. आता हे सर्व एकत्र करू घ्या. वरून हळद, तिखट घाला. पीठ एकजीव करून घ्या.

आता एका मोठ्या प्लेटवर तेल लावून घ्या. त्याच्यावर हे पीठ हाताने चांगले पसरवून घ्या. त्यावर पांढरे तीळ टाका. चाकूने काप (वड्या) पाडून घ्या.

दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करून घ्या. एक एक वड्या तळून घ्या. तुम्ही पीठामध्ये खाण्याचा सोडा देखील टाकू शकता. खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडीचा जेवणासोबत आस्वाद घ्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news