Pan-Aadhar Card Link : पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही कसे चेक करावे?

Pan-Aadhar Card Link
Pan-Aadhar Card Link

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : प्राप्तीकर विभागाने काही दिवासांपूर्वी एक परिपत्रक काढून सर्वांना ३१ मार्च २०२३ पर्यंत आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, ही मुदत जवळ येत असल्याने काहींनी घाईगडबडीत आधारला पॅन लिकं केले आहे. परंतु, त्यांना स्वत:ला लिंक झाले आहे की नाही? याची खात्री नसते. तर आता घाबरण्याचे काही कारण नाही, दोन सोप्या पद्धतीने आधार कार्डला पॅन लिंक झालेले आहे की नाही? याची माहिती घरबसल्या मोबाईलवर चेक करता येईल. (Pan-Aadhar Card Link)

काही लोकांनी मुदत संपत चालल्याने घाईगडबडीत आधार कार्डला पॅनला लिंक करण्याची प्रोसेस केलेली असते. तर काहींचे लिंक करताना इंटरनेटच्या व्यत्ययामुळे लिंक झाले आही की नाही? याची माहिती कळत नाही. अशावेळी काय करावे हे कळत नाही. मात्र, आता घाबरण्याचे काहीच कारण नाही. आता तुम्ही स्वत: तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही, हे पाहू शकता.

पहिला सोपा मार्ग

आयकर विभागाच्या साईटवर जाऊन तुम्हाला आपले पॅन काडर्ड आधारशी लिंक आहे की नाही, हे तपासता येईल. तुम्ही आयकर विभागाच्या साईटवर गेल्यानंतर लॉगिन करताच त्याच्याखाली आधार कार्ड ऑप्शन दिसेल. तुम्ही तेथे माहिती भरताच तुमच्या तपशीलामध्ये पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे की नाही? हे दिसेल.

दुसरा सोपा मार्ग

आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या साईटला लॉगिंन केल्यावर डाव्या बाजूला 'आधार स्टेटस लिंक' असे  लिहिलेले दिसेल. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक तपशील भरावा लागेल. हे दोन्ही नंबर किंवा तपशील टाकल्यानंतर उजव्या बाजूला आधार स्टेटस पाहण्यासाठी एक लिंक येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक झाले आहे की नाही हे समजणार आहे.

आधार कार्डला पॅनशी लिंक करण्याची तारीख ३१ मार्च २०२३ पर्यंत आहे.  या दोन सोप्या पद्धतीने तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही? याची शहानिशा करून घ्या. (Pan-Aadhar Card Link)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news