Pan Card : पॅनकार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र असण्याबरोबरच आर्थिक व्यवहारासाठी अत्यावश्यक असणारे दस्तऐवज आहे. गरज भासल्यास अनेकदा आपल्याला पॅनकार्डची माहिती संबंधितांना द्यावी लागते. परंतु त्याचा गैरवापर तर होत नाही ना? याकडेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे.
प्राप्तिकर विभागाशी निगडित सर्व कामकाजात पॅनकार्ड महत्त्वाची भूमिका बजावते. बँकिंगच्या कामासाठीदेखील पॅनकार्डचे विवरण द्यावे लागते आणि अन्य व्हेरिफिकेशनसाठीदेखील त्याची गरज भासते. याचे महत्त्व पाहता, गैरप्रकार होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.
कदाचित आपल्या पॅनकार्डचे विवरण चोरून एखादा व्यक्ती कर्ज घेऊ शकतो. अशा प्रकारची फसवणूक करणार्या लोकांची संख्या कमी नाही. अर्थात तशी फसवणूक करणे कठीण आहे. कारण बँकेकडून कर्ज घेताना कागदपत्रात आणि प्रक्रियेत थोडीफार तफावत दिसून आल्यास कर्ज मागणीचा अर्ज हा फेटाळला जाऊ शकतो. परंतु, अशा कोणत्याही मार्गाने कर्जाचा अर्ज मंजूर झाला तर आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो. कारण अशा प्रकारचे कर्ज आपल्या खांद्यावर येईल आणि त्यामुळे सीबिल स्कोअर खराब होईल.
Pan Card : पडताळणी करणे गरजेचे
पॅनकार्डवर एखाद्याने कर्ज घेतले आहे का? याची पडताळणी करायला हवी. यासाठी सी बिल, इक्विफॅक्स, पेटीएम, बँक बाजार किंवा 'सीआरआयएफ'वर आणि सीबिल स्कोअरची तपासणी करू शकता. या ठिकाणी सीबिलच्या संकेतस्थळावर स्कोर कसा तपासावा हे सांगता येईल.
Pan Card : कशी करावी तपासणी
Pan Card : ही प्रकिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला पॅनकार्डवर किती कर्ज आहे, याची माहिती मिळू शकते. पॅनकार्डचा चुकीचा वापर होत असल्याचे वाटत असेल किंवा एखाद्याने आपल्या पॅनवर कर्ज घेतले असेल तर त्याची तक्रार https://incometax.intelenetglobal.com/pan/pan.asp वर करता येते.
विधिषा देशपांडे