‘Hindenburg Research’ करणार आणखी एक ‘धमाका’ : ‘मोठा अहवाल’ येत असल्‍याचा संस्‍थेने केला दावा

‘Hindenburg Research’ करणार आणखी एक ‘धमाका’ : ‘मोठा अहवाल’ येत असल्‍याचा संस्‍थेने केला दावा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आपल्‍या अहवालांद्वारे शेअर बाजारात खळबळ माजवणाऱ्या 'हिंडेनबर्ग रिसर्च'ने (Hindenburg Research ) आणखी एक मोठा अहवाल येणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. काही दिवसांपूर्वीच 'हिंडेनबर्ग रिसर्च' अहवालाचा मोठा फटका अदानी समूहाला बसला होता. या अहवालानंतर अदानी समुहातील शेअर्समध्‍ये मोठी घसरण झाली. गौतम अदानी २०२२ मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या स्थानावरून ते थेट २३ व्या स्थानावर घसरले आहेत. 'ग्लोबल रिच लिस्ट २०२३ 'चा अहवालानुसार अदानी यांच्या संपत्तीत ३५ टक्क्यांची घसरण झाली आहे. आता हिंडेनबर्ग रिसर्च कोणत्‍या कंपनीविषयी अहवाल आणणार, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे.

'हिंडेनबर्ग रिसर्च' म्‍हणजे काय?

'हिंडेनबर्ग रिसर्च' ही एक आर्थिक संशोधन करणारी अमेरिकेतील संस्‍था आहे. या संस्‍थेची स्‍थापना २०१७ मध्‍ये नॅथन अँडरसन यांनी केली. ही कंपनी शेअर बाजारातील इक्‍विटीसह संपूर्ण मार्केटमधील डेटाचे विश्‍लेषण करते. या कंपनीचे नाव १९३७ मधील हिंडेनबर्ग एअरशिप दुर्घटनेवरुन घेण्‍यात आले आहे. हिंडेनबर्ग एअरशिप हे अमेरिकेतील न्‍यू जर्सीमध्‍ये उड्‍डाण घेत असताना पेटले होते. या दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्‍यू झाला होता.

'Hindenburg Research'चे आर्थिक संशोधन

शेअर मार्केटमध्‍ये पैशांचा गैरवापर झाला आहे का, एखादी कंपनी स्‍वत:चे गैरव्‍यवस्‍थापनकडे डोळाझाक करत आर्थिक गुंतवणुकीचे आकडे फुगवत आहे का, कंपनी स्‍वत:च्‍या फायद्यासाठी शेअर बाजारात चुकीच्‍या व्‍यवहार करुन अन्‍य कंपन्‍यांच्‍या शेअर्सचे नुकसान करत आहे का, अशा प्रश्‍नांची आर्थिक संशोधनातून केला जात असल्‍याचा दावा संस्‍था करते. यापूर्वी 'हिंडेनबर्ग रिसर्च'ने अमेरिका, कॅनडा आणि चीनच्या सुमारे १८ कंपन्यांचे स्वतंत्र अहवाल प्रकाशित केले आहेत, त्यानंतर बराच गोंधळ झाला होता. बहुतेक कंपन्या अमेरिकेतील होत्या, ज्यांना वेगवेगळ्या आरोपांचा सामना करावा लागला.हिंडनबर्गचा आजवर सर्वाधिक चर्चा झालेला अहवाल हा निकोला या अमेरिकेतील ऑटो क्षेत्रातील मोठ्या कंपनीबद्दल होता. या अहवालानंतर निकोलाचे शेअर्स ८० टक्क्यांनी घसरले होते. निकोलाचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष ट्रेवर मिल्टन यांनी कंपनीचा राजीनामा दिला होता. हिंडनबर्गच्‍या अहवालानंतर कंपनीची चौकशी सुरू करण्‍यात आली होती.


हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news