UK Indian High Commission : खलिस्तानवाद्यांना चोख प्रत्युत्तर; ‘यूके’तील भारतीय उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर पुन्हा दिमाखात तिरंग फडकावला | पुढारी

UK Indian High Commission : खलिस्तानवाद्यांना चोख प्रत्युत्तर; 'यूके'तील भारतीय उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर पुन्हा दिमाखात तिरंग फडकावला

पुढारी ऑनलाइन डेस्क : लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाच्या (UK Indian High Commission) इमारतीवर पुन्हा एकदा मोठा तिरंगा दिमाखात फडकवण्यात आला. खलिस्तानी समर्थकांनी इमारतीबाहेरील भारतीय ध्वज खाली खेचल्यानंतर भारतीय दूतावासाने खलिस्तानवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. युकेमधील लंडन येथील उच्चायुक्तालयाच्या टेरेसवर कर्मचारी मानवी साखळी करून लांब तिरंगा घेऊन उभे राहिले. खलिस्तानी समर्थक निदर्शने करत असतानाच त्यांनी अभिमानाने राष्ट्रध्वज फडकावला. तसेच उच्चायुक्तालयाची इमारत राष्ट्रध्वजाने झाकली.

(UK Indian High Commission) उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर सुरुवातीला एक छोटा राष्ट्रध्वज उभारला. मात्र, आज पुन्हा 2000 पेक्षा अधिक खलिस्तान समर्थक इमारतीसमोर आले. तेव्हा भारतीय दुतावास कर्मचाऱ्यांनी छतावर उभे राहून राष्ट्रध्वजाने उच्चायुक्तालयाची संपूर्ण तटबंदी झाकली. यावेळी छायाचित्रांमध्ये दूतावासातील डझनभर कर्मचारी मानवी साखळी करून टेरेसवर लांब तिरंगा घेऊन उभे असल्याचे दिसत आहे.

रविवारी घडलेल्या गोंधळाच्या दृश्यांच्या विपरीत, खलिस्तान समर्थकांना आज रस्त्यावरच थांबवण्यात आले. तेथे पोलीस अधिकारी उभे राहून गस्त घालत होते. यावेळी काही फुटीरतावाद्यांनी पोलिसांवर शाई आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या. (UK Indian High Commission)

दिल्लीतील पोलिसांनी ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेरील वाहतूक अडथळे हटवल्यानंतर लंडनमध्ये (UK Indian High Commission) अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले. काही लोकांनी लंडनमध्ये घेतलेल्या सतर्कतेचा अर्थ ब्रिटनने भारताच्या नाराजीला दिलेला प्रतिसाद असा केला. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, बॅरिकेड्स हटवण्यामागील कारण म्हणजे ते प्रवाशांना “अडथळा आणत” होते.
दरम्यान भारताच्या निषेधानंतर, लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी (UK Indian High Commission) इंडिया हाऊसजवळ उभ्या असलेल्या 20 हून अधिक बसेस तैनात केल्या आहेत आणि रस्त्यावर गस्त घालण्यासाठी सैन्य तैनात केले आहे.

हे ही वाचा :

चिनी एकाधिकारशाहीचे ‘कुटिल उद्योग’

Gudhi Padava Shoping : कोल्हापूर : खरेदीचा पाडवा; 200 कोटींची उलाढाल

Back to top button