Indigo Flight : विमानात धिंगाणा सुरूच; इंडिगोच्या फ्लाइटमध्ये दोन मद्यधुंद प्रवाशांचे कर्मचा-यांशी गैरवर्तन

indigo flight
indigo flight
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : विमानात सहप्रवासी आणि क्र्यू मेंबर्ससह गैरवर्तन करून धिंगाणा घालण्याचे प्रकार सुरूच आहे. दुबईहून मुंबईला येणा-या इंडिगो फ्लाइटमध्ये (Indigo Flight) बुधवारी दोन प्रवाशांनी मद्यधुंद अवस्थेत सहप्रवाशांना आणि क्र्यू मेंबर्सला शिवीगाळ करून गोंधळ घातला. दोघांवर एअरलाइन्स कर्मचार्‍यांच्या तक्रारीवरून मुंबईच्या सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

जॉन जी डिसूझा (नालासोपारा ४९) आणि कोल्हापूरमधील मानबेट येथील दत्तात्रय बापर्डेकर (४७), अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. एफआयआर नोंदवणाऱ्या सहार पोलिसांनी सांगितले की, मुंबईत या वर्षात दाखल झालेला हा सातवा अनियंत्रित उड्डाणाचा गुन्हा आहे. (Indigo Flight)

इंडिगोच्या दुबई-मुंबई फ्लाइटमधून (Indigo Flight) बुधवारी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन फ्लायर्सना अटक करण्यात आली. त्यांच्यावर आयपीसी कलम 336 अन्वये इतरांचे जीवन आणि सुरक्षितता धोक्यात आणल्याबद्दल आणि उड्डाण धोकादायक केल्याबद्दल, तसेच सहप्रवाशांशी गैरवर्तन आणि मद्यपान करण्यासाठी संबंधित विमान नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते दोघेही दुबईमध्ये वर्षभर काम केल्यानंतर भारतात परतण्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी शुल्क नसलेली दारू विकत घेतली होती. दोघांनी जवळपास अर्धी बाटली दारू रिकामी केली होती. मुंबईत या वर्षात दाखल झालेला हा सातवा अनियंत्रित उड्डाणाचा (Indigo Flight) गुन्हा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Indigo Flight) इंडिगो 6E 1088 विमानाने दुबईहून सकाळी 8 वाजता उड्डाण करताच, नालासोपारा येथील रहिवासी जॉन जी डिसूझा (49) आणि कोल्हापूरचे दत्तात्रय बापर्डेकर (47) अनुक्रमे 20-B आणि 18-E वर बसले होते. त्यांनी ड्युटीफ्री दुकानातून बाटल्या विकत घेतल्या होत्या. "जेव्हा त्यांच्या शेजारी बसलेल्या फ्लायर्सने त्यांच्या सतत मद्यपानावर आक्षेप घेतला तेव्हा त्यांनी त्यांच्यावर शिवीगाळ केली," असे सहार पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

तक्रारीत, वरिष्ठ केबिन क्रू मनदीप सिंग म्हणाल्या "बापर्डेकर फ्लाइटमधील शेवटच्या सीटवर गेले आणि चेतावणी देऊनही त्यांनी मद्यपान चालू ठेवले, तर डिसूझाने त्यांच्या सीटवर मद्यपान केले. मी बापर्डेकरांची बॅग तपासली आणि त्यात दारूची अर्धी रिकामी बाटली आणि काही तंबाखूच्या पुड्या सापडल्या. मी दोघांनाही मद्यपान थांबवण्यास सांगितले कारण फ्लाइटमध्ये त्याची परवानगी नाही. " (Indigo Flight)

तसेच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल या तिच्या इशाऱ्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि ते विमानाच्या दोन सीटमधील मोकळ्या जागेत ते फिरत राहिले आणि क्रू आणि सह-फ्लायर्सवर शिवीगाळ करत राहिले. "सिंगने त्यांच्या बाटल्या काढून घेतल्यावर त्यांनी तिला शिवीगाळ केली. तिने कॅप्टनला माहिती दिली आणि विमान मुंबईत उतरताच दोघांना अटक करण्यात आली," असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Indigo Flight)

मुंबईत या वर्षात नोंदवलेली ही सातवी अनियंत्रित फ्लायर केस आहे. सर्वात अलीकडील 11 मार्च रोजी अमेरिकेतील दुहेरी नागरिकत्व धारण केलेला रहिवासी रत्नाकर द्विवेदी (37), याने हवाई जहाजावर धूम्रपान केल्याबद्दल अटक करण्यात आली होती आणि लंडनमध्ये आपत्कालीन एक्झिट उघडण्याचा कथित प्रयत्न केला होता. हा प्रकार मुंबई एअर इंडियाच्या विमानात घडला होता. 14 मार्च रोजी 25,000 रुपयांच्या जामिनावर सुटल्यानंतर तो अमेरिकेला परतला.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news