मी लिहून देतो, मोदी सरकार सत्तेत येणार नाही; राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांचा दावा

मी लिहून देतो, मोदी सरकार सत्तेत येणार नाही; राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या दोन दिग्गज नेत्यांच्या 28 मिनिटांच्या या संभाषणात राहुल गांधींनी सत्यपाल मलिक यांच्याशी पुलवामा हल्ला, शेतकरी आंदोलन, एमएसपी, जातिगणना, मणिपूर हिंसाचार यासह विविध मुद्द्यांबाबत संवाद साधला आहे. या मुलाखती दरम्यान सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी, मी लिहून देतो, मोदी सरकार सत्तेत येणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे. त्यांचे हे विधान सोशल मीडियावर ट्रेंडिगला आहे.

यावेळी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले, मी स्पष्टपणे सांगतो की, जम्मू-काश्मीरच्या लोकांवर बळाचा वापर करुन काहीही फायदा होणार नाही. तेथील लोकांना प्रेमाने आणि विश्वासाने जिंकूनच तुम्हाला ते हवं ते साध्य करता येईल. त्यांना राज्याचा दर्जा परत मिळावा, असे मलाही वाटते. त्यांनी कलम 370 मागे घेत केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली. राज्याचे पोलीस बंड करतील, अशी भीती त्यांना वाटत होती. पण, जम्मू-काश्मीर पोलिसांनी केंद्र सरकारला नेहमीच पाठिंबा दिला आहे. अमित शहा यांनी राज्याचा दर्जा परत करू असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत करून तेथे निवडणुका घ्याव्यात, असं मलिक म्हणाले.

राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल विचारलं असता सत्यपाल मलिक म्हणाले की, "यांनी पुलवामा हल्ला केला असं मी म्हणणार नाही. पण यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि राजकीय फायदा उचलला. मतदान करायला जाल तेव्हा पुलवामामधील शहीदांचा आठवण ठेवा असं त्यांचं वाक्य आहे". यावेळी राहुल गांधींनी सांगितलं की, विमानतळावर जेव्हा शहिदांचे पार्थिव आणण्यात आले, तेव्हा मला रुममध्ये बंद कऱण्यात आलं होतं. मी भांडून तेथून बाहेर पडलो होतो.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news