Rahul Gandhi : ‘ईडी’, ‘सीबीआय’ अदानींची चाैकशी का करत नाही?: राहूल गांधींचा सवाल

राहुल गांधी ( संग्रहित छायाचित्र )
राहुल गांधी ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्क : अदानी यांच्‍या कंपन्‍यांची केंद्र सरकार सक्‍तवसुली संचालनालय ( ईडी) आणि केंद्रीय अन्‍वेषण विभागाकडून
(सीबीआय) चाैकशी का करत नाही, असा सवाल करत या संपूर्ण गैरव्यवहाराच्‍या चाैकशीसाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी संसदीय समिती स्थापन करावी,  अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (दि.३१) पत्रकार परिषदेत  केली.

इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स ( India Alliance meeting) या विरोधी आघाडीची आज (दि. ३१) मुंबईत तिसरी बैठक पार पडणार आहे. काँग्रेस नेत्‍या साेनिया गांधी आणि  राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरुन हल्लाबोल केला.अदानींच्या आर्थिक व्यवहारांबाबत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत देशात पारदर्शकता गरजेची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

राहुल गांधी म्‍हणाले, अमेरिकेतील वृत्तपत्रांनी अदानींच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या माहितीचा दाखला देत अदानींच्या गुंतवणुकीतील पैसे कोणाचे असा सवाल त्‍यांनी केला. मोदी आणि अदानी यांच्यात आर्थिक संबंध आहेत, असा आराेपही त्‍यांनी केला. चिनी गुंतवणुकदारांकडून देखील अदानी कंपनीत गुंतवणूक झाल्याचा दावाही त्‍यांनी केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news