पुढारी ऑनलाईन डेस्क
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ स्टारर 'हिरोपंती २' ची (Heropanti 2) जादू म्हणावी तशी चालली नाही. अजय देवगण आणि अमिताभ बच्चन स्टारर 'रनवे ३४' शुक्रवारी रिलीज झाला. तसेच यश स्टारर 'KGF: Chapter 2' मुळे दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षकांनी आपला कल वळवला. त्याचवेळी 'हिरोपंती २' रिलीज झाला. 'रनवे ३४' आणि 'हिरोपंती २' (Heropanti 2) हा चित्रपट कडवी टक्कर देईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, तिसऱ्या आठवड्यातही प्रशांत नीलच्या केजीएफ २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १० कोटींहून अधिक कमाई केली. दुसरीकडे, टायगरचा 'हिरोपंती २' तिसऱ्या दिवशीही १० कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही. त्यामुळे अॅक्शन फ्रँचायझी 'हिरोपंती २' ची कमाई रविवारी घसरली.
रिपोर्टनुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ३.७० कोटींची कमाई केली आहे. यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन १५.६ कोटी रुपये झाले आहे. वीकेंडला चित्रपटांच्या कलेक्शनमध्ये सामान्यतः वाढ झाली. 'हीरोपंती २' च्या कलेक्शनमध्ये दुस-या आणि तिसर्या दिवशी घट झाली. ओपनिंग डेच्या दिवशी ६.२५ कोटी कमावणाऱ्या 'हिरोपंती २' ने शनिवारी ५.२५ कोटी रुपयांची कमाई केली.
'हिरोपंती 2'चे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत. टायगरने क्रिती सेनॉनसोबत हिरोपंती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर हे दोघे अभिनेता विकास बहलच्या गणपत या चित्रपटात पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत.
हिरोपंती २ ला चित्रपट समीक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. चित्रपट समीक्षकांच्या माहितीनुसार, टायगरचा डान्स आणि ॲक्शन, नवाजुद्दीन सिद्दीकीची विलेनगिरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. टायगर श्रॉफच्या ॲक्शनने पुन्हा फॅन्सना वेडं बनवलं आहे. आता येत्या काही दिवसांत टायगरची हिरोगिरी बॉक्स ऑफिसवर कितपत चालते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.