BGR-34 : तीन वर्षांच्या अध्ययनानंतर ‘ दिल्ली एम्सचा ‘बीजीआर-३४’ औषधावरील निष्कर्ष जाहीर

BGR-34 : तीन वर्षांच्या अध्ययनानंतर ‘ दिल्ली एम्सचा ‘बीजीआर-३४’ औषधावरील निष्कर्ष जाहीर

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-आयुर्वेदिक औषध 'बीजीआर-३४' (BGR-34 ) मधुमेहग्रस्तांमधील शर्करेच्या (शुगर) प्रमाणासह स्थुलपणाही कमी करण्यात प्रभावी असल्याचा दावा दिल्ली एम्स रुग्णालयाने एका अध्ययानातील निष्कर्षाअंती केला आहे. मधुमेहासाठी वापरात येणारे हे आयुर्वेदिक औषध वजन कमी करण्यासह शरीरातील चयापचय तंत्रातही सुधारणा करते,असा देखील दावा 'एम्स'ने केला आहे.

मधुमेहग्रस्तांना स्थुलपणामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेता एम्स चे फार्माकोलाॅजी विभागाचे प्राध्यापक डाॅ.सुधीर कुमार सारंगी यांच्या देखरेखीखाली तीन वर्षांपर्यंत अध्ययन करण्यात आले.अध्ययना दरम्यान 'बीजीआर-३४' ला मधुमेहासाठी उपयोगात येणाऱ्या इतर अँलोपॅथी औषधांसोबत प्रयोगात आणून होणाऱ्या प्रभावाची चाचपणी करण्यात आली. अध्ययनाअंती बीजीआर-३४ रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करीत स्थुलपणा कमी करण्यातही गुणकारक असल्याचे निष्कर्ष हाती आले.
BGR-34 : वनौषधी ग्लाइकेटेड हिमोग्लोबिनला (एचबीए१सी) नियंत्रणात ठेवते

BGR-34 : औषधातील वनौषधी ग्लाइकेटेड हिमोग्लोबिनला नियंत्रणात ठेवते

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) वैज्ञानिकांनी बनवलेल्या बीजीआर-३४ औषधाची बाजारातील विक्रीची जबाबदारी एमिल फार्मास्युटिकल्स ला देण्यात आली आहे. पोलॅन्ड च्या 'सीएंडो' जर्नल नुसार या औषधातील वनौषधी ग्लाइकेटेड हिमोग्लोबिनला (एचबीए१सी) नियंत्रणात ठेवते.

मार्च २०१९ पासुन सुरू करण्यात आलेल्या या अध्ययनात दरवर्षी वेगवेगळ्या समुहावर अभ्यास करण्यात आला. या दरम्यान हार्मोन प्रोफाईल, लिपिड प्रोफाइल, ट्राइग्लिसराईड्स स्तर नियंत्रणात असल्याचे दिसून आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

ट्राइग्लिसराईड्स एक वाईट कोलेस्ट्रॉल असून, त्याचा शरीरातील अतिरेक नुकसानदायक ठरतो. लिपिड प्रोफाइल नियंत्रणात ठेवल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. हार्मोन प्रोफाईलमध्ये बिघाड झाल्याने मधुमेहग्रस्तांच्या भूक, झोपेवर परिणाम होतो. लवकरच यावरील शोधपत्र प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news