मुंबई : पुढारी वृत्तसेवा मंगळवार रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने आज (बुधवार) पहाटे पासून दमदार हजेरी लावली. जोरदार पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गवरील वाहतूकीचा वेग मंदावला आहे. यामूळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले.
मुंबई, ठाणे नवी मुंबईत आज पहाटे पासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. मठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ, कसारा, कर्जत भागात मुसळधार पाऊस असल्याने येथून मुंबईत येणाऱ्या लोकल खूप उशिराने धावत आहेत. परिणामी सीएसएमटीच्या दिशेने येणारी वाहतूक अर्धा तासापेक्षा विलंबाने धावत आहे. अनेक रेल्वे स्थानकावर पावसामुळे लोकल लेट असल्याची उदघोषणा होत आहे.
नवी मुंबईत देखील पावसाने जोर कायम ठेवला असल्याने पनवेल ते सीएसएमटी लोकल वाहतूक विलंबाने सुरु आहे. 20 ते 25 मिनिटे लेट गाड्या धावत आहेत. यामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. लोकलचे बंचिंग कमी करण्यासाठी रेल्वे अनेक गाड्या रद्द करीत आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. पश्चिम रेल्वेवर विरार मध्ये पाणी भरले आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील 15 ते 20 मिनिट उशिराने सुरु आहे.
हेही वाचा :