Mumbai Heavy Rain: मुंबईसह, रायगड पालघरमध्ये मुसळधार; नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली | पुढारी

Mumbai Heavy Rain: मुंबईसह, रायगड पालघरमध्ये मुसळधार; नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

पुढारी ऑनलाईन: भारतीय हवामान खात्याने आज (१९ जुलै) पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. या अंदाजानुसार मुबईसह रायगड, पालघर आणि काही भागात मुसळधार पासाने आज (दि.१० जुलै) सकाळपासून थैमान (Mumbai Heavy Rain) घातला आहे.

पालघर आणि रायगड (महाड) येथे आज सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर त्येकी एक NDRF टीम तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती NDRF ने दिली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर (Mumbai Heavy Rain) जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.

रायगडच्या रसायनी पोलीस ठाण्यात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. तसेच येथील आपटा गावात नदी किनारे लगत वस्तीत पाणी भरल असुन, तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे, दरम्यामन परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती जिल्हा पाेलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी, अंबा नदी आणि पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदीही धोक्याचे पातळी ओलांडण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

राज्यातील अनेक भागात मुसळधार

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात आणि मदत कार्य आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करावीत, अशा सूचना दिल्या.
  • बदलापूर-अंबरनाथ रेल्वे मार्ग बंद झाल्याने शहरातील काही भागात मुसळधार पावसानंतर पाणी साचले आहे: मध्य रेल्वेचे सीपीआरओ
  • मुंबईतील भांडुप भागात घर कोसळून एकाचा मृत्यू: BMC

हेही वाचा:

Back to top button