Heatwave alert: देशाच्या ७ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याचा इशारा

Heatwave alert: देशाच्या ७ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याचा इशारा
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा:  हवामान खात्याने देशातील ७ राज्यांमध्ये पुढील ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात दोन दिवसांनंतर उष्णतेच्या लाटेचा (Heatwave alert प्रभाव दिसून येईल. अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्यानुसार, मराठवाडा आणि विदर्भात तापमानाचा पारा जास्त असेल. महाराष्ट्र आणि छत्तीसगडसह देशातील ७ राज्यांमध्ये पुढील ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heatwave alert) दिला आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. तर दोन दिवसांनंतर मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येईल.

संबंधित बातम्या:

Heatwave alert: पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज
सोमवार, ६ मे : छत्तीसगडसह ४ राज्यांमध्ये उष्णतेची लाट छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये दमट उष्णता असेल. मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात जोरदार वारे वाहतील.
मंगळवार, ७ मे : मध्य प्रदेश आणि राजस्थानसह ४ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये ताशी ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये दमट उन्हाळा सुरू राहील.
बुधवार, ८ मे : गुजरातसह ५ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राबरोबरच गुजरातमध्येही उष्णतेची लाट राहील. तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये विजेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news