Health Facility : मोदी सरकारच्या काळात आरोग्य सुविधा मजबूत झाल्या; आरोग्य मंत्री मांडविया

Health Facility : मोदी सरकारच्या काळात आरोग्य सुविधा मजबूत झाल्या; आरोग्य मंत्री मांडविया
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

मागील सरकारांनी आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सुविधांकडे (Health Facility) मोठी दुर्लक्ष केले होते. पण त्या सरकारांवर दोषारोप न करता मोदी सरकारने गेल्या काही वर्षात आरोग्यविषयक पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी लोकसभेत कोरोना – 19 विषयावरील चर्चेला उत्तर देताना केले.

चांगले परिणाम हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून रालोआ सरकार काम करीत आहे. शक्तीने नव्हे तर प्रखर इच्छाशक्तीने हे सरकार काम करते, हे गत दोन वर्षांच्या काळातील मोदी सरकारच्या निर्णयाद्वारे दिसून आले आहे, असे सांगून मांडविया पुढे म्हणाले की, देशात आतापर्यंत कोरोनाचे 3.46 कोटी रुग्ण सापडले आहेत, तर संसर्गाने 4.6 लाख लोकांचा बळी घेतला आहे.

भारतातला मृत्यूदर 3.46 टक्के इतका आहे. लोकसंख्येच्या बाबतीत प्रति दशलक्षाचा विचार केला तर दशलक्षामागे संसर्ग झालेल्यांची संख्या 25 हजार इतकी असून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 340 इतकी आहे. संसर्ग व मृत्यूदराची कमी सरासरी असलेल्या देशात भारताचा समावेश असल्याचे याद्वारे दिसून येते. (Health Facility)

भारतात 13 जानेवारी 2020 रोजी केरळमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण सर्वप्रथम सापडला होता. मात्र तत्पूर्वीच 8 जानेवारी 2020 रोजी कोरो नासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त देखरेख समितीची बैठक झाली होती. यावरून सरकार दक्ष होते, हेच दिसून येते असे मंडविया म्हणाले. एखाद्या लसीवर संशोधन झाल्यानंतर त्याच्या प्रत्यक्ष वापरास परवानगी मिळण्यासाठी सुमारे तीन वर्षे जातात. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन आम्ही या नियमांमध्ये बदल केला. कारण देशाला लवकरात लवकर लस मिळणे गरजेचे होते. संशोधन आणि विकासाच्या एका वर्षाच्या आत प्रत्यक्ष लोकांना लस मिळू लागली. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेतला होता.

हेही वाचा

व्हिडिओ पहा : म्हणूनच शाहू महाराजांनी कधीही व्यसन न करण्याचा निर्धार केला | Story of Shahu Maharaj

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news