मिस केरळ आणि मॉडेलच्या मृत्युमागे ड्रग पेडलर; पाठलाग केल्याने कारचा अपघात | पुढारी

मिस केरळ आणि मॉडेलच्या मृत्युमागे ड्रग पेडलर; पाठलाग केल्याने कारचा अपघात

मिस केरळच्या मृत्यूमागे ड्रग पेडलर

कोची; पुढारी ऑनलाईन 

केरळमधील कोची येथे रात्री एक पार्टीनंतर मिस केरळ विजेती अनसी कबीर आणि मिस केरळची फर्स्ट रनर अप अंजना शाजान घरी जात होत्या.

कारमध्ये त्यांचा आणखी एक मित्र आणि ड्रायव्हर होता. रात्रीचा काळोख कापत कार सुसाट वेगाने जात होती. वेगात धावणारी कार अचानक पलटली आणि या अपघातात अनसी आणि अंजना जागीच ठार झाल्या. तर त्यांचा मित्र उपचारावेळी वारला. चालक अजूनही शुद्धीवर नाही. 

हा अपघात होता का? कारचा वेग इतका का वाढवण्यात आला होता? या तिघांच्या मृत्यू मागे काही काळेबेरे आहे का? अशी शंका पोलिसांच्या मनात होती. 

केरळ पोलिसांनी असा केला तपास?

पोलिसांनी जेथून कार निघाली त्या पार्टीच्या ठिकाणापासून चौकशीला सुरुवात केली. काही धागेदोरे हाती आल्यानंतर पोलिसांना या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला.

या दोन मॉडेल केरळमध्ये प्रसिद्ध आहेत. त्या ज्या पार्टीत गेल्या होत्या तेथे एक व्यक्ती चुकीच्या पद्धतीने त्यांच्याशी वागत होता. तुम्ही माझ्यासोबत रात्री चला, मी तुमची हॉटेलमध्ये राहाण्याची सोय करतो, असा म्हणत ही व्यक्ती या तरुणींचा पिच्छा करत होती. 

या तरुणाच्या त्रासाला कंटाळून अंजना आणि अनसी तेथून बाहेर पडल्या. पण ती व्यक्ती अंजना आणि अनसी यांच्या कारचा पाठलाग करू लागली. त्यामुळे अनसी आणि अंजना यांच्या कारच्या ड्रायव्हरने् आपल्या कारचा वेग वाढवला. आणि त्यातच या कारचा अपघात होऊन, तिघांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी ही माहिती मिळाल्यानंतर या व्यक्तीचा शोध सुरू केला. या व्यक्तीचं नाव सज्जू थंकचन असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या सज्जूवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिस या प्रकरणात सज्जू समवेत अजून कोणी होते का याचा तपास करत आहेत.

हे वाचलं का?

पाहा व्हिडिओ 

Back to top button