हार्दिकची रोहित शर्माला शिवीगाळ? ट्विटरवर Video व्हायरल

हार्दिकची रोहित शर्माला शिवीगाळ? ट्विटरवर Video व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहे. तो मैदानावरील त्याच्या चपळतेसाठी ओळखला जातो. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका 2-1 जिंकली. आता हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो काहीतरी बोलत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या रोहित शर्माला शिवीगाळ करत असल्याचा दावा ट्विटरवर चाहते करत आहेत. जाणून घेऊया, या व्हिडिओची वास्तविकता.

दुसऱ्या T20 सामन्यात भारताने इंग्लंड संघाचा 49 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आवाज आणि शिवीगाळ नीट ऐकू येत नाही, मात्र चाहत्यांचा दावा आहे की व्हिडिओमधील आवाज हार्दिक पांड्याचा आहे. व्हिडिओ फक्त 10 ते 15 सेकंदांचा आहे. ट्विटरवर (#HardikAbusedRohit, #HardikPandya) चे हॅशटॅग देखील चालवले जात आहेत. चाहत्यांनीही हार्दिक पांड्याला अहंकारी म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये क्षेत्ररक्षणाबाबत संवाद आहे. (Hardik Pandya Abused Rohit Sharma)


हार्दिक पांड्याचे टीम इंडियात पुनरागमन

आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या टीम इंडियात परतला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 चे विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर त्याने आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचे नेतृत्वही केले. हार्दिक बॉल आणि बॅटने शानदार खेळ दाखवण्यात माहीर आहे, पण इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये तो कोणताही करिष्मा करू शकला नाही.

ट्विटरवर चाहत्यांनी हार्दिक पांड्याबद्दलचा राग व्यक्त केला…

ही संपूर्ण घटना त्यावेळची आहे जेव्हा इंग्लंडचा संघ भारताकडून 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. त्यानंतर इंग्लंडच्या डावाच्या चौथ्या षटकात हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. त्यावेळी इंग्लंडचे फलंदाज डेव्हिड मलान आणि लियाम लिव्हिंगस्टन क्रीजवर उपस्थित होते. मालन 8 आणि लिव्हिंगस्टन 15 धावांवर खेळत होते. हार्दिक इंग्लंडच्या डावातील चौथे षटक टाकत असताना स्टंपच्या माईकमध्ये हार्दिकचा आवाज कैद झाला, ज्यामध्ये तो रोहितला शिवीगाळ करताना दिसत आहे असा दावा ट्विटर वापरकर्त्यांकडून केला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पांड्याचा आवाज डीआरएस घेण्याच्या चर्चेदरम्यान असल्याचा दावा ट्विटरवर केला जात आहे. त्याचवेळी रोहितशी बोलताना हार्दिकने अपशब्द वापरले. मात्र, त्याने हा गैरव्यवहार कोणाला केला हे स्पष्ट झालेले नाही. याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. (Hardik Pandya Abused Rohit Sharma)

तो व्हायरल व्हिडिओ येथे पहा…

भारताचा मालिका विजय…

नॉटिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने भारताचा 17 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 215 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 9 गडी गमावून 198 धावाच करू शकला. भारतीय संघासाठी सूर्यकुमार यादवने जबरदस्त शतक झळकावले पण त्याला उर्वरित फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे या सामन्यात भारताला 17 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतरही भारतीय संघाने मालिका 2-1 अशी जिंकली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news