“इंझमामचे मानसिक संतुलन बिघडलय..” : धर्मांतर टिप्‍पणीवर हरभजन सिंगने फटकारले

पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हक आणि भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग. ( संग्रहित छायाचित्र ) 
पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हक आणि भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग. ( संग्रहित छायाचित्र ) 

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : "पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हक (Inzamam-ul-Haq) याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. कृपया त्‍याला डॉक्‍टरांकडे घेऊन जावा. मी एक शीख आहे आणि मला खूप आनंद झाला आहे. शीख कुटुंबात जन्म झाला," अशा शब्‍दांमध्‍ये भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) याने  फटकारले. ( Harbhajan slams Inzamam )

काय म्‍हणाला होता इंझमाम उल हक ?

पाकिस्‍तानमधील एका कार्यक्रमात बोलताना इंझमाम उल हक याने दावा केला होता की, "२००५ मध्‍ये भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यात क्रिकेट मालिका झाली होती. या मालिकेवेळी हरभजन सिंग याने मौलाना तारिक जमील यांचे भाषण ऐकले. यावेळी हरभजन सिंग धर्मांतर करुन इस्‍माल धर्म स्‍वीकारण्‍याच्‍या तयारीत होता."

Harbhajan slams Inzamam : हरभजन सिंगने दिले सडेतोड प्रत्‍युत्तर

'इंडिया टूडे'ला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये हरभजन सिंग याने इंझमाम उल हक याने केलेल्‍या धर्मांतरावरील टिप्‍पणीचा समाचार घेतला. तो म्‍हणाला की, मला एवढेच सांगायचे आहे की कोणीतरी इंझमाम उल हक याला डॉक्टरकडे घेऊन जावे. त्याची मानसिक स्थिती योग्य नाही, कृपया त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा. मी एक शीख आहे आणि मला खूप आनंद झाला आहे. शीख कुटुंबात जन्म झाला,"

यावेळी हरभजन याने स्‍पष्‍ट केले की, इंझमाम उल हक हे सर्व नाटक पाकिस्‍तानमधील माध्‍यमांसमोर करत आहे. तो अशा प्रकारे विधान का करत आहे हेच मला कळत नाही की. तो किती दारु पितो किंवा तो काय धूम्रपान करतो हे मला माहित नाही आणि मला खात्री आहे की, तो त्यात जे काही बोलला ते मद्यधुंद अवस्थेतच बोलला असावा, त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी काही आठवत नाही." हरभजनने इंझमामला अभिमानास्पद भारतीय आणि अभिमानी शीख असल्याचे ट्विट करून फटकारले होते.

पाकिस्‍तान क्रिकेट संघाची यंदाच्‍या विश्‍वचषक स्‍पर्धेतील कामगिरी अत्‍यंत निराशाजनक झाली. यानंतर इंझमाम उल हक याने संघाच्या मुख्य निवडकर्त्याच्या पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. मी पाकिस्‍तान क्रिकेट मंडळाला माझ्‍याबाबत उठवलेल्या हितसंबंधांच्या आरोपांबद्दल पारदर्शक चौकशी करण्याची संधी देण्यासाठी पदावरून पायउतार होत आहे. समितीने मला दोषी ठरवले नाही तर मी मुख्य निवडकर्ता म्हणून माझी भूमिका पुन्हा सुरू करेन, असे इंझमाम याने म्‍हटले होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news