Harbhajan Singh On Babar Azam : आयपीएलऐवजी बिग बॅश सर्वोत्तम; बाबरच्या वक्तव्यावर हरभजन सिंगची फिरकी | पुढारी

Harbhajan Singh On Babar Azam : आयपीएलऐवजी बिग बॅश सर्वोत्तम; बाबरच्या वक्तव्यावर हरभजन सिंगची फिरकी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Harbhajan Singh On Babar Azam)  कायम चर्चेत असतो. दरम्यान, कर्णधार बाबरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बाबर आझम यांने आयपीएलऐवजी बिग बॅश लीगमध्ये खेळण्यास प्राधान्य असेल, असे म्हटले आहे. यावर भारताचा माजी फिरकीपट्टू हरभजन सिंग यांने ट्विट करून बाबरची खिल्ली उडवली आहे.

हरभजन सिंगने एक इमोजी शेअर करून बाबर आझमला (Harbhajan Singh On Babar Azam)  ट्रोल केले आहे. त्याचबरोबर बाबर आझमच्या वक्तव्यावर चाहते सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. बाबर आझम याला आयपीएलमध्ये खेळण्याची तळमळ लागली असताना त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे त्यांने असे वक्तव्य केले आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेकांनी दिल्या आहेत.

दरम्यान, एका मुलाखतीत बाबर आझमला जेव्हा विचारण्यात आले की त्याला आयपीएल किंवा बिग बॅश लीगमध्ये खेळायला आवडेल, तेव्हा त्याने सांगितले की, मला बिग बॅश लीगचा भाग व्हायला आवडेल. मात्र, सोशल मीडियावर बाबर आझमची खिल्ली उडवली जात आहे.

Harbhajan Singh On Babar Azam : बिग बॅश सर्वोत्तम आहे – बाबर आझम

ऑस्ट्रेलियातील परिस्थिती वेगळी आहे, आव्हाने वेगळी आहेत. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या खूप वेगवान आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला खूप काही शिकायला मिळते, पण आयपीएलमध्ये असे घडत नाही. आयपीएलमध्ये तुम्हाला अशीच आशियाई परिस्थिती मिळते, जिथे फलंदाजी फारशी आव्हानात्मक नसते, असे बाबर यांने म्हटले आहे. यावर बाबर आझमला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. आता भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने ट्विटरवर बाबर आझमची खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा 

Back to top button