अब तांडव होगा…कंबोज यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

अब तांडव होगा…कंबोज यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते मोहित कंबोज  (Mohit Kamboj) यांच्या राष्ट्रवादीचा एक मोठा – नेता नवाब मलिक  (Nawab Malik) आणि अनिल देशमुख  (Anil Deshmukh) यांच्या बरोबर जेलमध्ये जाणार, या आशयाच्या ट्विटने खळबळ उडवली आहे. त्यातच त्यांनी हर हर महादेव…अब तांडव होगा असे आणखी एक सूचक ट्विट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अब तांडव होगा

भाजप नेते मोहित कंबोज  (Mohit Kamboj) राष्ट्रवादीला टार्गेट करत असल्याचे त्यांच्या ट्विटवरुन लक्षात येत आहे.  कालपासून त्यांनी तीन खळबळजनक ट्विट केली आहेत. त्यांनी आज सकाळी हर हर महादेव…अब तांडव होगा…. हे  ट्विट केले आहे. यामध्ये ट्विटने पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

मंगळवीरी त्यांनी एक ट्विट केले होते की, "हे ट्विट जपून ठेवा (Save This Tweet) म्हणत, राष्ट्रवादीचा एक मोठा – नेता नवाब मलिक  (Nawab Malik) आणि अनिल देशमुख  (Anil Deshmukh) यांच्या बरोबर जेलमध्ये जाणार"  राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक  (Nawab Malik) आणि अनिल देशमुख  (Anil Deshmukh) हे सध्या ऑर्थर जेलमध्ये आहेत. या ट्विटने आता राष्ट्रवादीचा हा बडा तिसरा नेता कोण जो जेलमध्ये जाणार? याबद्दल राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा  रंगली आहे.

निलेश राणे यांनी मोहित कंबोज यांचे हर हर महादेव…अब तांडव होगा… हे ट्विट रिट्विट केले आहे. यावर सोशल मीडिया युजर्सच्या प्रीतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news