पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या ट्विटने खळबळ उडाली आहे. मोहित कंबोज यांनी सूचक ट्विटची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे. हे ट्विट जपून ठेवा (Save This Tweet) म्हणत, राष्ट्रवादीचा एक मोठा – नेता नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या बरोबर जेलमध्ये जाणार, असे सूचक ट्विट केले आहे. या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.