HBD Rekha : रेखा यांची लक्झरी लाईफ, आलिशान घर आणि बरंच काही….

actress rekha
actress rekha
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री रेखाने आपल्या दिलकश अंदाजात, चमकत्या सौंदर्यासोबत आणि दमदार अभिनयाच्या जोरावर या इंडस्ट्रीवर अनेक दशके अधिराज्य गाजवलं. अभिनेत्री रेखा वयाच्या ६७ व्या वर्षी इतक्या सुंदर आहेत (HBD Rekha) की, चेहऱ्यावरील चमक आणि तेज पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. केवळ १४ वर्षांची असताना रेखा यांनी चित्रपटामध्ये काम करणं सुरू केलं होतं. रेखा बॉलीवूडच्या मोठ्या सुपरस्टार राहिल्या आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले आहेत. रेखा यांचं आयुष्य बालपणापासूनच संघर्षाने भरलेला होता. रेखा यांना त्यांच्या अगदी साधा लूक आणि साध्या लाईफस्टाईलमुळे चित्रपटांतून रिजेक्ट करण्यात आलं होतं. त्या दिसायला सावळ्या असल्याने देखील त्यांना चित्रपट नाकारण्यात आले होते. (HBD Rekha)

आज १० ऑक्टोबर रोजी रेखा यांचा वाढदिवस. त्याऔचित्याने त्यांच्याविषयी जाणून घेऊया, या खास गोष्टी.

बॉलीवूड अभिनेत्री रेखा हिंदी चित्रपटांतील एव्हरग्रीन अभिनेत्री आहे. खूप सुंदर आणि या लोकप्रिय अभिनेत्रीने एकेकाळी १८० चित्रपटांमध्ये काम केलं. रेखा आपल्या चित्रपटांसोबत वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत होती. रेखा यांच्या चित्रपटाविषयी तर माहितीये. पण, त्यांचे लक्झरीयस घर आणि त्यांच्याशी संबंधित अनेक माहिती गोष्टी फारशी चर्चेली गेलेली नाही.

रेखा यांच्या घराचे नाव 'बसेरा'

सदाबहार अभिनेत्री रेखा मुंबईत सर्वात पॉश भागात राहते. रेखाचं घर बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खानच्या घराजवळ आहे. किंग खान प्रमाणे रेखाचा बंगलादेखील समुद्राच्या एकदम समोर आहे. रेखाच्या घराचं नाव 'बसेरा' आहे'. या घराची किंमत काय आहे, याविषयी कुठलीही अधिकृत माहिती नाही. पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या घराची किंमत जवळपास १ अब्ज आहे.

सोशल मीडियावर रेखाच्या घरचे अनेक फोटो उपलब्ध आहेत. या फोटोंवरून सहजपणे अंदाज लावू शकतो की, त्यांच्या घरात अनेक महागड्या वस्तू उपलब्ध आहेत. रेखाला घर सजवण्याची आवड आहे. यासाठी रेखा यांनी देश-विदेशातील अनेक महागड्या वस्तू आणल्या आहेत.

कसं चालतं रेखा यांचा घर खर्च?

सोशल मीडियावर कधी-कधी चर्चा होत असते की, रेखा यांचं घर कसं चालतं. न कुठला चित्रपट, न कुठली जाहिरात?. पण, रेखा कोणत्या कोणत्या चित्रपटात दिसतातचं. रिपोर्टनुसार, तिचं दक्षिण भारतात एक आलीशान घरदेखील आहे. हे घर भाड्याने देण्यात आले आहे. शिवाय, त्यांचे काही पर्सनल इन्वेस्टमेंट आणि बँकेचे व्याज मिळते.


(photo :_queen_rekha, _) and rekha_the_actress insta वरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news