Jaya Bachchan B’day : जया कोट्यवधींची जमीन, दागिन्यांची मालकीण

Jaya Bachchan
Jaya Bachchan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आणि दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांचा आज वाढदिवस होय.  (Jaya Bachchan B'day)त्यांचा जन्म ९ एप्रिल, १९४८ रोजी जबलपूर येथे झाला. (Jaya Bachchan B'day) अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर त्या आता राज्यसभा खासदार झाल्या. जया केवळ अभिनेत्रीच नाहीत तर त्या एक यशस्वी राजकारणीदेखील आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यशोगाथा लिहिणाऱ्या जया या कोट्यवधींच्या संपत्तीच्या मालकीणही आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वैभवाविषयी जाणून घेऊया.

जया बच्चन
जया बच्चन

जया बच्चन लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. जेव्हा त्यांनी अभिनय करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी त्यासाठी प्रशिक्षण घेतले. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे येथून अभिनयातील बारकावे शिकले आणि सुवर्णपदकही मिळवले. आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, जया यांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी सत्यजित रे यांच्या 'महानगर' चित्रपटात काम केले होते.

जया बच्चन
जया बच्चन

गुड्डी चित्रपटातून पदार्पण

'गुड्डी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जया यांनी हृषिकेश मुखर्जींच्या 'गुड्डी' या हिंदी चित्रपटात काम केले आणि आपल्या निरागसतेने प्रेक्षकांची मने जिंकली. पहिल्याच चित्रपटाच्या अफाट यशानंतर जया यांची कारकीर्द चमकली. यानंतर 'उपहार', 'कोशिश', 'कोरा कागज', 'अभिमान', 'हजार चौरासी की मां', 'मिली', 'चुपके-चुपके', 'शोले' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयातील कौशल्य दाखवले.

जया बच्चन
जया बच्चन

अमिताभ बच्चन यांच्याशी विवाह

१९७३ मध्ये मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केल्यानंतर जया बच्चन जया भादुरीपासून जया बच्चन झाल्या. त्या अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन या दोन मुलांची आई झाल्या. पुढे जया यांनी समाजवादी पक्षातून आपल्या राजकारणाला सुरूवात केली.

अमिताभ आणि जया कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्यसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या प्रतिज्ञापत्रात जया बच्चन आणि त्यांचे पती अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती १०.०१ अब्ज होती. प्रतिज्ञापत्रानुसार, जया यांच्या नावावर बँक आणि विविध वित्तीय संस्थांकडून सुमारे ८८ कोटी रुपयांचे कर्ज दाखविण्यात आले होते. जया यांच्याकडे ६७ कोटी ७९ लाख ३१ हजार ५४६ रुपयांची संपत्ती होती.

जया बच्चन
जया बच्चन

जया बच्चन या कोटींच्या दागिन्यांच्या मालकीन आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, एवढेच नाही तर जया बच्चन यांच्याकडे २६ कोटी ११ लाखांचे दागिने आहेत. याशिवाय ८ लाख ८५ हजार किमतीची वाहने आहेत. दुबईच्या बँकेतही सुमारे ६ कोटी ६० लाख रुपये जमा आहेत. दागिन्यांसह जया यांच्याकडे लखनौच्या काकोरी आणि भोपाळमध्ये ३७ कोटी २५ लाखांची शेतजमीन आहे. हे आकडे पूर्वीचे आहेत, आता त्यात आणखी वाढ झाली असण्याची शक्यता आहे.

(photo- the.retrocinema.lover and jayabachchan_, jaya.bachchan insta वरून साभार) 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news