यामीने काढली खरडपट्टी! | पुढारी

यामीने काढली खरडपट्टी!

पुढारी ऑनलाईन

यामी गौतम आणि अभिषेक बच्चन यांचा ‘दसवी’ अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. या दोघांच्याही अभिनयाची अनेकजण प्रशंसा करीत आहेत. मात्र, अनेकजण टीकाही करीत असतातच. ज्यावेळी एखादा चित्रपट प्रदर्शित होतो त्यावेळी काही मीडिया पोर्टल्स त्याचा रिव्ह्यू देत असतात. अशाच एका रिव्ह्यूमध्ये यामीच्या अभिनयावर टीका करण्यात आली होती. आपण घेतलेली मेहनत आणि चित्रपटातील अभिनयाची अनेकांनी केलेली प्रशंसा या पार्श्‍वभूमीवर या रिव्ह्यूमध्ये आपल्या अभिनयावरच बोट ठेवले आहे, हे पाहून यामी नाराज झाली. तिने रिव्ह्यूचा स्क्रीनशॉट शेअर करून आपली नाराजी सोशल मीडियातून जाहीर केली आणि संबंधित मीडिया पोर्टलची खरडपट्टी काढली. यापुढे या पोर्टलने कधीही तिच्या कामाचा रिव्ह्यू देऊ नये, असेही तिने म्हटले आहे.

Back to top button