HBD Chiranjeevi : सर्वाधिक टॅक्स भरणारा चिरंजीवी कमवतो तरी किती?

south actor chiranjivi
south actor chiranjivi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता चिरंजीवी (South actor Chiranjeevi) आज आपला ६७ वा वाढदिवस साजरा करत आहे. आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेले चिरंजीवी साऊथ चित्रपट इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरा आहे. त्यांनी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये वेगळी (HBD Chiranjeevi) ओळख बनवली आहे. अभिनेता चिरंजीवी मद्रास चित्रपट इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी होते. १९७८ मध्ये त्यांनी आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात 'मना पूरी पंडावुलू' या चित्रपटातून केली होती. त्यानंतर त्यांनी 'आय लव्ह यू' आणि 'ईदी कथा कडू' यासह अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले. साऊथ इंडस्ट्रीत या अभिनेत्याला ओळखीची गरज नाही. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत अभिनयाची नवी व्याख्या आणली. त्यांनी आपल्या गंभीर अभिनय कौशल्याने कलेचा स्तर उंचावला आहे. तुम्हाला माहितीये का चिरंजीवी आयकर भरणाऱ्या अभिनेत्यांमध्ये टॉपला आहे. त्यांची वर्षाला कमाई किती आहे माहितीये का? (HBD Chiranjeevi )

असंही म्हटलं जातं की, हा अभिनेता अल्पावधीतच तेलुगू चित्रपटसृष्टीचा एक चमकता तारा बनला. यानंतर या अभिनेत्याने हळूहळू कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. चिरंजीवीच्या कारकिर्दीत एक काळ असा होता जेव्हा ते भारतातील सर्वात महागडा अभिनेते असायचे. त्यांची गणना भारतातील त्या अभिनेत्यांसोबत झाली, ज्यांचे नाव आणि मानधन फार चर्चेत होते.

१९९२ मध्ये आलेल्या 'घराना मोगुडू' चित्रपटातून तो भारतातील सर्वात महागडा अभिनेता ठरले. असं म्हटलं जात होतं की, एकेकाळी चिरंजीवी एका चित्रपटासाठी दीड कोटी रुपये घेत होते. त्यावेळी अमिताभ बच्चन एक कोटी रुपये घेत असत.

या पुरस्काराने सन्मानित

चिरंजीवीने आपल्या शानदार अभिनयासाठी अनेक पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. त्यांना ९ वेळा दक्षिण भारतीय फिल्मफेअर ॲवॉर्ड आणि चार वेळा नंदी ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे. २०११ मध्ये फिल्मफेअरकडून चिरंजीवी यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. इतकचं नाही तर त्यांना 'पद्मभूषण'नेदेखील गौरवण्यात आले आहे. त्यांना आंध्र विद्यापीठाने डॉक्टरेट उपाधीदेखील दिली आहे.

कर भरण्याच्या बाबतीत टॉपवर

कर भरण्याच्या बाबतीत चिरंजीवी हे देशातील सर्वात मोठ्या करदात्यांपैकी एक आहेत. त्यांनी चित्रपटांमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. ते उद्योगातील सर्वात अष्टपैलू आणि प्रबळ अभिनेत्यांपैकी एक अभिनेते आहेत. चिरंजीवी हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये राहतात. नुकतेच त्यांनी बंगळूरमध्ये घर घेतले आहे. या रिअल इस्टेट मालमत्तेची किंमत सुमारे २८ कोटी रुपये आहे. चिरंजीवी दरवर्षी ४५ कोटी रुपये कमावतात. त्यांची एकूण संपत्ती सुमारे १५५० कोटी रुपये आहे. चिरंजीवी मेगा टीव्हीचा 'मिलो इवारू कोटेश्वरुडू'देखील होस्ट करतात. रिपोर्ट्सनुसार, ते प्रत्येक एपिसोडसाठी १० लाख रुपये घेतात. त्यांच्या स्वत:च्या १५० व्या चित्रपटासाठी २७ कोटी रुपये घेतले आहेत.

याशिवाय चिरंजीवीला त्याच्या चित्रपटातून मिळणाऱ्या नफ्यातील वाटा मिळतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news