HBD Akshay Kumar : अक्षयच्या चित्रपटांना तुफान गर्दी व्हायची, आता फ्लॉप का ठरताहेत?

akshay kumar
akshay kumar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तीन दशकाच्या करिअरमध्ये अक्षय कुमारने इतक्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे की, फक्त एका वर्षातील आकडा ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारचा (HBD Akshay Kumar) आज वाढदिवस. एकेकाळी अक्षयचे चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी व्हायची. आता मात्र त्याचे एकापेक्षा एक चित्रपट फारसे चालले नाहीत किंवा फ्लॉप ठरले. रक्षाबंधन हे ताजे उदाहरण आहे. अक्षयचा 'सम्राट पृथ्वीराज' आणि नंतर 'रक्षाबंधन' बॉक्स ऑफिसवर आपटल्याने कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागेल आहे. इतकं होऊनही अक्षयचे स्टारडम मात्र कमी झालेलं नाही. ९ सप्टेंबर रोजी अक्षय आपला ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. (HBD Akshay Kumar)

अभिनय-फिटनेसच्या जोरावर स्टारडम मिळवलं

आपला अभिनय आणि फिटनेसच्या जोरावप अक्षयने स्टारडम मिळवलं आहे. लाखोंच्या मनावर गारुढ घालणाऱ्या अक्षयला अनेकदा टीकास्त्र झेलावं लागलं आहे. पण, असा एक काळ होता, जेव्हा तो चित्रपटात दिसणार म्हणजे चित्रपट हिट ठरणार, अशी गॅरंटी असायची.

१९९१ मध्ये 'सौगंध' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या अक्षयला त्यावेळी अंदाजदेखील नव्हती की, तो लाखो-करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल. तीन दशकाच्या करिअरमध्ये अक्षयने जवळपास १३६ बॉलीवूडपट केले. यापैकी काही ब्लॉकबस्ट ठरले. तर काही फ्लॉप ठरले. यामागील कारण म्हणजे – चित्रपटाचे कथानक हे प्रेक्षकांना आवडलेले नाही. शिवाय, डायरेक्शन आणि स्टोरीतील विसंगती हे मुख्य कारण होय. सोबतचं साऊथ चित्रपटांनी हिंदीमध्ये येऊन घातलेला धुमाकूळ होय. साऊथ चित्रपटांच्या तोडीचे बॉलिवूडपट आले नाहीत. शिवाय सोशल मीडियावरील बायकॉट बॉलिवूडचाही परिणाम सिनेमांवर झालेला दिसतो.

यावर्षी सर्वाधिक चित्रपट

सन १९९४ मध्ये अक्षयच्या करिअरचा महत्वाचा टप्पा म्हणज यावर्षी त्याने ११ चित्रपट केले. यापैकी पाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. यावर्षी अक्षयने एलान, ये दिल लगी, जय किशन, मोहरा, मैं खिलाडी तू अनाडी, इक्के पे इक्का, अमानत, सुहाग, जख्मी दिल, जालिम आणि हम हैं बेमिसालमध्ये काम केले. पाच चित्रपट हिट आणि सहा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळले. यामध्ये जय किशन, इक्के पे इक्का, अमानत, जखमी दिल, जालिम आणि हम हैं बेमिसाल यासारखे चित्रपट केले. तर सर्वात कमी चित्रपट २०२० मध्ये केले. यावर्षी त्याचा एकच चित्रपट रिलीज झाला, तोही ओटीटीवर. या चित्रपटाचे नाव होते 'लक्ष्मी.' चित्रपट समीक्षकांकडून त्यास निगेटिव्ह रिव्ह्यू मिळाले होते. हॉरर कॉमेडी चित्रपटात कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत होती.

movie raksha bandhan
movie raksha bandhan

रक्षा बंधनमुळे कोटींचे नुकसान

दुसरीकडे, अक्षयच्या रक्षाबंधन चित्रपटाने जवळपास ५७.१४ कोटी कमावले. ७० कोटींचे बजेट असलेल्या चित्रपटाने जगभरात ६८.१४ कोटींची कमाई केली. अक्षय कुमारचे तीन चित्रपट – बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज आणि रक्षा बंधन बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. तर अक्षयचा यावर्षीचा चौथा रिलीज झालेला मिस्ट्री-थ्रिलर कठपुतली लोकप्रिय ठरला नाही. फ्लॉप चित्रपटांनंतरही अक्षयचे स्टारडम कमी झालेले नाही. त्याच्या झोळीत एकापेक्षा एक चित्रपट आहेत.

राम सेतू (Ram Setu)

अक्षयचा हा चित्रपट वादात सापडला आहे. अक्षयचा हा चित्रपट २४ ऑक्टोबर, २०२२ रोजी रिलीज होणार आहे.

ओह माय गॉड २ 

अक्षय कुमार स्टारर 'ओह माय गॉड २' चे पोस्टर रिलीज झाले आहे. अक्षयचा हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

कॅप्सूल गिल 

जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर अक्षय कुमारचा हा चित्रपट बनत आहे. हा चित्रपट देखील २०२३ साली येणार आहे.

गोरखा 

या यादीत अक्षय कुमार आणि आनंद एल राय यांच्या 'गोरखा' चित्रपटाचेही नाव आहे. या चित्रपटाबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट ऑगस्ट २०२३ मध्ये रिलीज होणार आहे.

सेल्फी 

या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत बॉलिवूड स्टार अक्षय कुमार दिसणार आहे. हा चित्रपट २३ फेब्रुवारी, २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट साऊथ चित्रपटाचा रिमेक आहे.

बडे मियाँ छोटे मियाँ 

अक्षय कुमारचा हा बिग बजेट चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत टायगर श्रॉफही दिसणार आहे. अक्षयचा हा चित्रपट २०२३ साली प्रदर्शित होणार आहे.

'सूरराय पोत्रू' (सूरराय पोत्रू रीमेक) 

बॉलीवूड स्टार अक्षय कुमारही सूरराई पोत्रू या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही.

जॉली एलएलबी ३ 

'जॉली एलएलबी'च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाच्या यशानंतर आता निर्माते चित्रपटाचा तिसरा भाग आणण्याचा विचार करत आहेत. या चित्रपटात तुम्हाला अक्षय कुमार आणि अर्शद वारसी दिसणार आहे.

स्कायफोर्स
अक्षय कुमारचा हा चित्रपट एअरफोर्सवर आधारित आहे. या चित्रपटाची बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी २०२३ पासून सुरू होणार आहे.

सी शंकरन 

या चित्रपटात अक्षय कुमार चंकी पांडेची मुलगी अन्या पांडेसोबत दिसणार आहे. हा चित्रपट न्यायमूर्ती सी शंकरन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाबाबत बराच वाद झाला होता, ज्याचे कारण अनन्या पांडे आणि अक्षय कुमार असल्याचे मानले जात होते.

खेल खेल में

मुदस्सर अजीज दिग्दर्शित 'खेल खेल में' या कॉमिक एंटरटेनर चित्रपटातही अक्षय कुमार दिसणार आहे. या चित्रपटाबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याचा खुलासा झालेला नाही.

सिंघम ३ 

बॉलिवूडचा बहुचर्चित दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सिंघम ३ या चित्रपटात अक्षय कुमारही दिसणार आहे. अलीकडे या चित्रपटाची बरीच चर्चा झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news