HBD Aishwarya : ऐश्वर्या-सलमान वादात ‘देवदास’चे काय कनेक्शन?

HBD Aishwarya : ऐश्वर्या-सलमान वादात ‘देवदास’चे काय कनेक्शन?

(HBD Aishwarya) : एक अशी अभिनेत्री जी सलमान खानच्या आयुष्‍यात आली, जिची चर्चा माध्यमात झाली तशीच ती सर्वसामान्यांच्यातही चर्चेत राहिली. ती सुंदर अभिनेत्री म्‍हणजे ऐश्वर्या राय. ♥️सलमानच्‍या आयुष्‍यात ॲश आल्यानंतर सलमानच्‍या लव्हस्टोरीला ♥️नव्याने सुरुवात झाली. ती इतकी पुढे गेली की, शेवटी त्याचे रुपांतर द्वेषात झाले. ऐश्वर्या आणि सलमानचं नाव जितकं चर्चिलं गेलं ते फक्त एका अयशस्‍वी लव्‍ह स्टोरीसाठी. आज ऐश्वर्या राय हिचा वाढदिवस. (HBD Aishwarya) त्या औचित्याने तिच्या आणि सलमान खानच्या कंट्रोव्हर्शिअल रिलेशनशीपविषयी जाणून घेऊया. (HBD Aishwarya)

photo-lovely_aishwarya insta वरून साभार
photo-lovely_aishwarya insta वरून साभार

लॉन्ग ♥️स्टोरी

सलमान आणि ऐश्वर्याची प्रेम कहाणी १९९७ मध्‍ये सुरू झाली होती. सलमान खान सुपरस्टार होता. तर ऐश्वर्याने बॉलिवूडमध्‍ये एन्‍ट्री केली होती. त्‍यावेळी सलमान आणि सोमीच्‍या अफेअरची चर्चा रंगली होती. सूत्रांच्‍या माहितीनुसार, सलमान अभिनेत्री सोमीसोबत रिलेशनशीपमध्‍ये होता. सलमान सोमीशी लग्‍नदेखील करणार होता. ऐश्‍वर्या बॉलिवूडमध्‍ये सेटल होत असताना त्‍यावेळी सलमानची नजर ऐश्‍वर्यावर पडली आणि सलमानने सोमी अलीशी ब्रेकअप घेतला.

एका मासिकाने दिलेल्‍या माहितीनुसार, मन्‍सूर अलींचा चित्रपट 'जोश'मध्‍ये ऐश्‍वर्याची मुख्‍य भूमिका होती. या चित्रपटात काम करण्‍यास सलमानने नकार दिला होता, कारण ऐश्वर्याच्‍या भावाची भूमिका सलमानला करायची होती. पुढे ॲशच्‍या भावाची भूमिका शाहरुख खानने साकारली होती.

आणि ॲशला मिळाला मोठा ब्रेक

सूत्रांच्‍या माहितीनुसार, सलमानने ऐश्वर्याची इंडस्‍ट्रीतील नौका पार केली. तिचं करिअर घडवण्‍याची जबाबदारी सलमानने आपल्‍यावर घेतली. त्‍यामुळे ऐश्‍वर्याला 'हम दिल चुके सनम' या चित्रपटात मोठा ब्रेक मिळाला. सलमानचे मित्र संजय लीला भन्‍साळी यांनी ॲशला या चित्रपटात संधी दिली. येथून सलमान आणि ऐश्वर्याच्‍या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. चित्रपटाच्‍या शूटिंग वेळी दोघांची जवळीक वाढली. 'हम दिल दे चुके सनम'मध्‍ये अजय देवगण आणि सलमान खान यांच्‍या प्रमुख भूमिका होत्‍या. या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून बॉलिवूडमध्‍ये तिने यशाचं शिखर गाठलं.

ऐश्वर्या राय आणि सलमानच्‍या अफेअरच्‍या चर्चा रंगू लागल्‍या होत्‍या. ॲश सलमानच्‍या कुटुंबीयांना देखील भेटत असे. सलमानचे मित्र ॲशला वहिनी म्‍हणून बोलावत असत. परंतु, ॲशच्‍या आई-वडिलांना तिची सलमानसोबत असलेली मैत्री आवडत नव्‍हती. इतकचं नाही तर त्‍यांनी ॲशला सलमानशी दूर राहायला सांगितलं होतं. त्‍यानंतर, ॲश इतकी निराश झाली की, घर सोडून एकटी राहू लागली.
त्‍यादिवशीही असाच वाद झाला…

ऐश्वर्या राय आणि शाहरुख खानने एकत्र 'देवदास' चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. परंतु, एक वेळ अशी होती की, ॲश आणि शाहरूख एकमेकांकडे पाहायचेदेखील नाहीत. शाहरुखने ॲशला आपल्‍या चित्रपटातून बाहेरचा रस्‍ता दाखवला होता. शिवाय, तिच्‍यासोबत सर्व संबंध संपुष्‍टात आणले होते. खरंतरं, दोघे एकमेकांसोबत बोलत नव्‍हते.

सलमान खानमुळे शाहरुख बोलत नसल्‍याचं म्‍हटलं जात होतं. तब्‍बल १४ वर्षे शाहरुख आणि ऐश्वर्या एकमेकांसोबत बोलत नव्‍हते. शाहरुख आणि सलमान खानची घट्‍ट मैत्री होती. त्‍यावेळी ऐश्वर्या सलमानला डेट करत होती. सलमान ॲशसोबत राहायचा नेहमी प्रयत्‍न करायचा. कधी-कधी भांडण देखील करायचा. त्‍यादिवशीही असाच वाद झाला.

ऐश्वर्या शाहरुखसोबत 'चलते चलते' चित्रपटाचे शूटिंग करत होती. त्‍यावेळी सलमानने सेटवर जाऊन गदारोळ घातला. ॲशच्‍या गाडीचीदेखील तोडफोड केली. शाहरुखने कुठलाही विचार न करता आपल्‍या मित्राचे समर्थन केले. आणि ॲशला 'चलते चलते'मधून डच्‍चू दिला. इतकच नाही तर आणखी ४ चित्रपटांतून ऐश्वर्याला बाहेर केले.

या प्रकारामुळे ऐश्वर्या व्‍यथित झाली. तिच्‍या करिअरवरही बराच परिणाम झाला. शाहरुखने काही वर्षांनंतर ॲशची माफी मागितली. आज शाहरुख-ॲशची चांगली मैत्री आहे.

सलमान-ॲशच्‍या नात्‍यात दुरावा

असे म्हटले जाते की, एक दिवस मध्‍यरात्री सलमान ॲशच्‍या घरी पोहोचला आणि जोरजोरात दरवाजा वाजवू लागला. संतापलेल्‍या सलमानने १९ व्‍या मजल्‍यावरून उडी मारण्‍याची धमकीदेखील दिली. मध्‍यरात्री ३ वाजेपर्यंत सलमान दरवाजा वाजवत होता. सलमानच्‍या हातातून रक्‍त येत होतं. सलमानने घातलेल्‍या गोंधळामागे कारण होतं ते म्‍हणजे सलमानला ॲशशी लग्‍न करायचं होतं. परंतु, ॲशची इंडस्‍ट्रीत चलती होती. त्‍यावेळी तिला लग्‍न करायचं नव्‍हतं. नंतर ॲशच्‍या वडिलांनी सलमानविरोधात पोलिस ठाण्‍यात केसदेखील दाखल केल्‍याचेही वृत्त समोर आले होते.

सलमान-ॲशचा ब्रेकअप

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ॲश-सलमानची मैत्री असताना सोमी अलीचा सलमानला फोन आला. सोमी अलीला आपल्‍या वडिलांच्‍या ऑपरेशनसाठी मदत हवी होती. सलमान ऐश्वर्याला न सांगताच अमेरिकेला निघून गेला. ज्‍यावेळी ॲशला ही गोष्‍ट समजली, त्‍यावेळी नाराज झालेल्‍या ॲशने नाते संपवण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यानंतर सलमानने ऐश्वर्याचा चित्रपट 'कुछ ना कहो'च्‍या सेटवर पुन्‍हा एकदा गोंधळ घातला. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्‍य भूमिकेत होता. सलमानने ॲशच्‍या गाडीची तोडफोडदेखील केली होती. त्‍यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला होता.

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news