इस्रायलचे मोठे यश : 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा सूत्रधार निसाम अजिना ठार; हमसाला झटका

इस्रायलचे मोठे यश : 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा सूत्रधार निसाम अजिना  ठार; हमसाला झटका

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रालयच्या सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचा सूत्रधार असलेला हमासचा म्होरक्या निसाम अबू अजिना मारला गेला आहे. हमाससाठी हा मोठा झटका मानला जात आहे. Israel palestine conflict

७ ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर पाच हजार रॉकेट डागले होते. यात १४०० इस्रायली नागरिक मारले गेले होते. त्यानंतर इस्रायलने हमासला प्रत्युत्तर म्हणून गाझावर हल्ले केले आहेत, आणि जमिनीवरील कारवाई सुरू केली आहे. इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार अबू अजिना होता. अबू अजिना हमासच्या बैत लाहिया या बटालियनचा कमांडर होता. हमासने हवाई हल्ल्यांची क्षमता विकसित केली आहे, पॅरग्लाईंडचा वापर करून हमासचे दहशतवादी हल्ले घडवू शकतात. हमासच्या हवाई दलाचे नेतृत्त्व अजिना करत होता, असे इंडिया टुडेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

इस्रायलची गाझात आगेकूच | Israel palestine conflict

हमासने जवळपास २४० इस्रायली नागरिकांना बंधक बनवले आहेत. यातील एका सैनिकाला सोडवण्यात इस्रायलला यश आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सर्व बंधकांना सोडवण्यासाठी इस्रयाल कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. तसेच हमसाशी कोणताही शस्त्रसंधी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

गाझातील ९४० मुले बेपत्ता | Israel palestine conflict

गाझावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात आणि त्यानंतर सुरू असलेल्या जमिनीवरील कारवाईत ९४० मुले बेपत्ता झाली आहेत, असे युनिसेफ या संस्थेने म्हटले आहे. तसेच शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने नवजात मुलांचे मृत्यू होण्याचे प्रकार वाढले आहेत, असेही युनिसेफने म्हटले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news