Gyanvapi Mosque: ज्ञानवापी सर्वेक्षण अहवालासाठी ‘ASI’ने १५ दिवसांची मुदतवाढ मागितली

Gyanvapi Mosque: ज्ञानवापी सर्वेक्षण अहवालासाठी ‘ASI’ने १५ दिवसांची मुदतवाढ मागितली

पुढारी ऑनलाईन डेस्क: ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल देण्यासाठी ASI ने १५ दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. या संदर्भातील मागणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) उत्तर प्रदेश न्यायालयाकडे केली आहे. याचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. ASI ने उत्तर प्रदेश न्यायालयाकडे तिसऱ्यांदा ज्ञानवापी सर्वेक्षण अहवालासाठी मुदवाढ मागितली आहे. यापूर्वी पहिल्यांदा ८ सप्‍टेंबर रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने ८ आठवड्यांचा कालावधी मंजूर केला होता. (Gyanvapi Mosque)

जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने २१ जुलै रोजी एएसआयला ज्ञानवापी संकुलाचे (सीलबंद बाथरूम वगळता) सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. ASI पथकाने २४ जुलैपासून सर्वेक्षणाचे काम सुरू केले. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर अहवाल तयार करण्यासाठी न्यायालयाने २ सप्‍टेंबर रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान ८ आठवड्यांचा कालावधी पहिल्यांदा वाढवला होता. त्यानंतर काही कारणास्तव ASI पथकाने पुन्हा २ नोव्हेंबर रोजी १५ दिवसांचा अवधी लागणार आहे, असे म्हणत १५ दिवसांची मुदत मागितली. तसेच न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश एएसआय दिले होते. मात्र यावेळी देखील अहवाल पूर्ण न झाल्याने आज (दि.१७) ASI पथकाने तिसऱ्यांना उत्तर प्रदेश न्यायालयाकडे आणखी १५ दिवसांची मुदत मागणार असल्याचे म्हटले आहे. (Gyanvapi Mosque)

ज्ञानवापी संकुलाच्या सर्वेक्षणाचा अहवाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात आज सादर करणार नाही. या संदर्भात माहिती देताना, केंद्र सरकारचे स्पेशल गव्हर्निंग कौन्सिल अमित श्रीवास्तव म्हणाले की, हा अहवाल अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे आम्ही १५ दिवसांचा अतिरिक्त वेळ देण्यासाठी आम्ही न्यायालयात अर्ज करणार आहोत. विविध ठिकाणांहून आलेली पथके आणि सणासुदीच्या सुट्ट्यांमुळे अहवाल तयार करण्यास विलंब झाल्याचे चित्र आहे, असे देखील अमित श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे. (Gyanvapi Mosque)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news