शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवास मंगलमय वातावरणात सुरवात

शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवास मंगलमय वातावरणात सुरवात

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  शिर्डीतील प्रमुख उत्सवांपैकी गुरुपौर्णिमा हा उत्सव महत्वाचा मनाला जात असून साईबाबांना गुरु पूजन करण्यासाठी साईभक्तांनी गर्दी केली. तर आज पहाटेच्या काकड आरतीने या उत्सवाची मंगलमय सुरवात झाली. तर सकाळी १० वाजेच्या सुमारास पावसाची संतत धार सुरू झाली असली तरी भविकामध्ये नवचैतन्य पाहवयास मिळाले. आज पहाटेच्या काकड आरतीने गुरुपौर्णिमा उत्सवास सुरुवात झाली. त्यानंतर मंदिरात साईबाबांचे मंगल स्नान झाले. द्वारकमाईमध्ये अखंड परायनाची सुरवात झाली. वीणा, साई प्रतिमा, सटका, ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली.

त्यानंतर मंदिरात पाद्यपूजन करण्यात आले. या उत्सवासाठी राज्यातुन विविध भागांतील पालख्या ही दाखल झालेल्या आहेत. मात्र अचानकपणे पावसाची १० वाजेच्या सुमारास संतत धार सुरू झाली. त्यावेळी भाविकांचा उत्साह कमी होईल असे वाटत असतांना भाविकांमध्ये एक नवचैतन्य संचारले आणि साईबाबा की जय अशा जय घोषाने मंदिर परिसर दणाणून निघाला. पालख्यामधील ढोल ताशे निनादु लागले. आणि एकच भक्तिमय वातावरण भर पावसात पहावयास मिळाले. साई मंदिर परिसरातील ग्राम दैवतांची मंदिरे, द्वारकामाई, चावडी, समाधी मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आलेले आहे. त्यामुळे हे भाविकांना खास आकर्षण वाटत होते. शिर्डीकरांनी जागोजागी येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान सुरू केले होते. त्यामुळे भाविक हा प्रसाद घेताना दिसून आले.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news