GT vs MI : गुजरातचा मुंबईवर ५५ धावांनी विजय

GT vs MI : गुजरातचा मुंबईवर ५५ धावांनी विजय
Published on
Updated on

अहमदाबाद; वृत्तसंस्था : शुभमन गिल, डेव्हिड मिलर व अभिनव मनोहर यांची धुवाँधार फटकेबाजी व नूर अहमदसह सहकारी गोलंदाजांच्या भेदक मार्‍याच्या बळावर गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात 55 धावांनी सनसनाटी विजय संपादन केला. प्रारंभी, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 6 बाद 207 धावांचा डोंगर रचणार्‍या गुजरातने मुंबईला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 152 धावांवर रोखण्याचा भीम पराक्रम गाजवला.

विजयासाठी 208 धावांचे खडतर आव्हान असताना मुंबईच्या डावाला प्रारंभापासूनच गळती लागली आणि यातून ते शेवटपर्यंत सावरू शकले नाहीत. मुंबईतर्फे नेहल वधेराने 21 चेंडूंत सर्वाधिक 40, तर कॅमेरून ग्रीनने 26 चेंडूंत 3 षटकारांसह 33 धावांचे योगदान दिले. मात्र, त्यांचे हे प्रयत्न अगदीच तोकडे पडले. सूर्यकुमार यादव 12 चेंडूंत 23 धावांवर बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा 2 धावांवर बाद झाल्याने मुंबईची सर्वाधिक निराशा झाली. गुजराततर्फे नूर अहमदने 37 धावांत 3, तर राशिद खान व मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

तत्पूर्वी, गुजरातने मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर निर्धारित 20 षटकांत 6 बाद 207 धावांचा डोंगर रचला. शुभमनने सर्वाधिक 56, मिलरने 46, तर अभिनव मनोहरने 42 धावांचे योगदान दिले. सलामीवीर वृद्धिमान साहा 4 धावांवर अर्जुनच्या गोलंदाजीवर यष्टीमागे ईशान किशनकडे सोपा झेल देत बाद झाला. या निर्णयावर त्याने डीआरएस घेतला होता; पण चेंडू ग्लोव्हजला स्पर्शून मागे गेल्याचे रिप्लेत स्पष्ट झाले.

तिसर्‍या स्थानावरील हार्दिक पंड्यालादेखील स्वस्तात परतावे लागले. फिरकीपटू चावलाच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने सूर्यकुमारकडे झेल दिला. स्विंग झालेल्या चेंडूवर लाँगऑफवरून षटकार खेचण्याचे त्याचे मनसुबे यावेळी पार धुळीस मिळाले. त्यानंतर विजय शंकरदेखील 16 चेंडूंत 19 धावांवर बाद झाला. त्यानेही चावलाच्या गोलंदाजीवर टीम डेव्हिडकडे सोपा झेल दिला.

विजय शंकर बाद झाला, त्यावेळी गुजरातची 12.2 षटकांत 4 बाद 101 अशी स्थिती होती. त्यानंतर मात्र डेव्हिड मिलर व अभिनव मनोहर यांनी पाचव्या गड्यासाठी 71 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. मेरेडिथने 19 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर अभिनवला लाँगऑफवरील बेहरेनडॉर्फकडे झेल देणे भाग पाडत ही जोडी फोडली होती.

हेही वाचा; 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news