जत : कोणीकोनूर दुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपीस तीन दिवसाची पोलीस कोठडी

जत : कोणीकोनूर दुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपीस तीन दिवसाची पोलीस कोठडी
Published on
Updated on

जत; पुढारी वृत्तसेवा : कोणीकोनूर (ता.जत) येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मायलेकीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संशयित आरोपी बिरुदेव उर्फ बिराप्पा नाना बेळुंखे (वय ३६) यास सोमवारी अटक केली होती. मंगळवारी पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता आरोपीस २७ एप्रिल पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वतःच्या पत्नीचा व मुलीचा खून कसा केला. याकरिता पूर्वनियोजित तयारी कट होता का? नेमके कारण काय? यात आणखी कोणी सामील आहेत का? यासंबंधीचा अद्याप उलगडा झाला नाही. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार करत आहे.

कोणीकोनूर येथील बेळुंखे वस्तीवर एका झोपडीत प्रिंयाका बिराप्पा बेळुंखे (वय ३२) व मोहिनी बिराप्पा बेळुंखे (वय १४) या दोन्ही मायलेकीचा मृतदेह आढळून आला होता. शेजारीच दोरी व ओढणी सापडली होती. ही घटना रविवारी (दि. २५) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. या दुहेरी हत्याकांडामुळे जत तालुका पुन्हा हदरला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी तात्काळ भेट देत घटनेची कसून तपास करण्याच्या सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना दिल्या आहेत. दरम्यान नातेवाईकांनी आरोपीस कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news