पुढारी ऑनलाईन: गुजरातमधील दक्षिणेकडील सूरत आणि नवसारी हे दोन मराठी बहुल जिल्हे आहेत. या भागात सर्वाधिक मराठी लोक राहतात. गुजरात विधानसभा निवडणूकीत या दोन्ही जिल्ह्यात भाजपनेच मुसंडी मारत गुजरातेतील मराठी माणसाच्या मनात आपले वर्चस्व स्थापित केले आहे. ( Gujarat Election )
दक्षिण गुजरातमधील सूरत आणि नवसारी या दोन्ही मराठी बहुल जिल्ह्यात जलालपूर (जि. नवसारी) लिंबायत व उधना (जि.सूरत ) हे तीन मतदारसंघ आहेत. या तिन्ही मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. लिंबायत मतदारसंघात संगीताबेन राजेंद्र पाटील या विजयी झाल्या आहेत. त्यांना ७८ हजार ८० ० मते मिळवली. या मतदारसंघात भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत झाली. यामध्ये त्यांनी काँग्रेसचे आयाज काझी आणि पंकजभाई तायडे यांचा पराभव केला.
नवरासी जिल्ह्यातील जलालपूर आणि सूरतमधील उधणा हे देखील मराठी बहुल जिल्हे म्हणून ओखळले जातात. यामधील जलालपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार आर.सी. पटेल यांनी १ लाख ६२ हजार मते मिळवत बहुमताने विजय मिळवला . प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार रणजित पानचाळ यांचा त्यांनी पराभव केला. तर आपचे उमेदवार प्रतिपकुमार यांना १० हजार ३०० मतांवर समाधान मानावे लागले. उधणा मतदारसंघात भाजपचे मनुभाई पटेल आप आपचे महेंद्रभाई पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली. या लढतीत भाजपचे मनुभाई पटेल हे ९३ हजार ८०० मते मिळवत विजयी झाले आहेत.
सुरत जिल्हयातील लिंबायत विधानसभा मतदारसंघात तब्बल ३० मुस्लिम अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. एकुण उमेदवार ४४ होते. या मतदारसंघातील मुस्लिम बांधावांचे मतदान हे ३० टक्के होते. मतांचे विभाजन होण्यासाठीच भाजपने ३० अपक्ष उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा आरोप काँग्रेसकडून होत होता. येथील जनतेने भाजपच्या उमेदवार संगीताबेन राजेंद्र पाटील यांनाच कौल दिला आहे.