गांधीनगर, पुढारी ऑनलाईन : गुजरातमधील भाजप नेते प्रदीपसिंह वाघेला यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या भाजपसाठी धक्का मानला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्यानंतर प्रदीपसिंह वाघेला हे गुजरात भाजपमधील दुसरे प्रभावी नेते होते.
पक्षाच्या सरचिटणीसपदाच्या राजीनाम्यावर प्रदीपसिंह वाघेला यांनी पुढील काही दिवसात सर्व काही ठीक होईल असे म्हटले आहे. वाघेला यांची १० ऑगस्ट २०१६ रोजी गुजरात भाजपचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. भाजप कार्यालयाने वाघेला यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याची पुष्टी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वर्षभराआधी वाघेला यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वतुर्ळात चर्चेला उधाण आले आहे. (Gujarat BJP) या वर्षी एप्रिलमध्ये आणखी एक सरचिटणीस भार्गव भट्ट यांना पक्षश्रेष्ठींनी सर्वोच्च पदावरून मुक्त केले होते. हे पद अजूनही रिक्त आहे.
हे ही वाचा :