कोठडीतील मृत्यू प्रकरणात गुजरात-महाराष्ट्र आघाडीवर; केंद्राची संसदेत माहिती | पुढारी

कोठडीतील मृत्यू प्रकरणात गुजरात-महाराष्ट्र आघाडीवर; केंद्राची संसदेत माहिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मागील पाच वर्षांच्या कालावधीत कोठडीतील मृत्यू प्रकरणांमध्ये गुजरात आणि महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले.

1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2023 या कालावधीत कोठडीत 687 लोकांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक 81 मृत्यू गुजरातमध्ये झाले असून 80 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. कोठडीतील मृत्यूच्या बाबतीत वरील दोन राज्यांपाठोपाठ मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू यांचा क्रमांक लागतो. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशात 50, बिहारमध्ये 47, उत्तर प्रदेशात 41 तर तामिळनाडूत 36 लोकांचा कोठडीत मृत्यू झाला असल्याचेही राय यांनी नमूद केले.

Back to top button