GT vs MI Qualifier 2 : मुंबईची प्लेइंग ‘अशी’ असेल, गुजरातमध्ये दोन बदल होण्याची शक्यता

GT vs MI Qualifier 2 : मुंबईची प्लेइंग ‘अशी’ असेल, गुजरातमध्ये दोन बदल होण्याची शक्यता
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : GT vs MI Qualifier 2 : गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2023 चा दुसरा क्वालिफायर आज (दि. 26) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये प्रथमच आमनेसामने येणार असून फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे जीटी आणि एमआय या दोन्ही संघांना महत्त्वाचे आहे. असे तरी हा मार्ग सोपा असणार नाही, हेही तितकेच खरे आहे.

मुंबईचा 13 प्लेऑफ सामन्यांत विजय

मुंबई इंडियन्सचा संघ लीग टप्प्यानंतर गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिला. संघाचे 14 सामन्यांत 8 विजय आणि 6 पराभवांसह 16 गुण होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने एलिमिनेटरमध्ये लखनौ सुपरजायंट्सचा 81 धावांनी पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला. संघ 10व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. एमआयने आयपीएलच्या प्लेऑफमध्ये आतापर्यंत 19 सामने खेळले असून त्यातील 13 सामने जिंकले आहेत. तर 6 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. (GT vs MI Qualifier 2)

सूर्या-रोहितसमोर रशीदचे आव्हान

आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि मध्यल्याफळीतील वादळी फलंदाज सूर्यकुमार यादव हे गुजरातचा अनुभवी फिरकी गोलंदाज रशीद खानशी टक्कर देताना दिसतील. वास्तविक, राशिदच्या समोर रोहित आणि सूर्या हे अपयशी ठरले आहेत. रशीदने रोहितला सहा डावात चार वेळा बाद केले आहे. सूर्याने राशिदच्या 47 चेंडूंचा सामना करत 67 धावा केल्या आहेत. (GT vs MI Qualifier 2)

मुंबईची प्लेईंग इलेव्हन अशी असणार?

क्वालीफायर 2 सामन्यात मुंबईच्या संघात चार विदेशी खेळाडू असतील. यात कॅमेरून ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, टिम डेव्हिड आणि ख्रिस जॉर्डन यांचा समावेश केला जाईल अशी शक्यता आहे. याशिवाय फलंदाजीला अनुकुल असणारी खेळपट्टी पाहता अष्टपैलू हृतिक शोकीनच्या जागी फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेयला संधी मिळू शकते.

आकाश, नेहलची शानदार कामगिरी

या आयपीएलमध्ये मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही पण तिलक वर्मा, नेहल वढेरा आणि आता आकाश मधवाल या खेळाडूंनी त्यांच्या आशांना नवे पंख दिले आहेत. एलिमिनेटरमध्ये लखनौविरुद्ध मधवालने पाच धावांत पाच विकेट घेत करिष्माई गोलंदाजी केली होती. त्याआधी हैदराबादविरुद्धच्या अंतिम साखळी सामन्यात त्याच्या तीन बळींनी मुंबईच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला. दुसरीकडे नेहल वढेरा याने आरसीबीविरुद्ध 52 आणि चेन्नईविरुद्ध 64 धावांची शानदार खेळी खेळली. एलिमिनेटरमध्येही त्याने लखनौविरुद्ध महत्त्वपूर्ण 23 धावा फटकावल्या.

गुजरात टायटन्स प्लेइंग 11 मध्ये बदल करणार?

गुजरात टायटन्सला कर्णधार हार्दिककडून मोठ्या आशा आहेत. त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये क्रमांक-4 च्या फलंदाजाची गरज आहे. हार्दिक पंड्या तिस-या क्रमांकावर चांगली फलंदाजी करतो. आयपीएल 2023 मध्ये त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना आठ डावांमध्ये 40 ची सरासरी ठेवली आहे. परंतु चौथ्या क्रमांकावर त्याला संघर्ष करावा लागला आहे. या स्थानावर फलंदाजी करताना त्याने पाच डावात 11.4 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. अशातच चौथ्या क्रमांकाचा फलंदाज जर झटपट माघारी परतला तर विरोधी संघासाठी ती जमीची बाजू ठरते. अशा परिस्थितीत हार्दिकला चौथ्या क्रमांकासाठी साई सुदर्शनला संधी देणे आवश्यक आहे. जीटीसाठी साईने शानदार फलंदाजी केली आहे. त्याच्या आगमनाने, दर्शन नळकांडे याचा पत्ता कट होईल, असा अंदाज आहे.

दुसरीकडे, जीटीचा दुसरा बदल जोशुआ लिटलच्या रूपात आपण पाहू शकतो. आयर्लंडचा हा वेगवान गोलंदाज आपल्या राष्ट्रीय संघासाठी उत्तम खेळून गुजरात संघात सामील झाला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लिटल शमीसह मुंबईच्या फलंदाजांना त्रास देऊ शकतो. त्याच्या येण्याने दासुन शनाकाला बाहेर बसावे लागू शकते. शनाकाला या मोसमात आतापर्यंत काही संधी मिळाल्या आहेत, पण त्याचा फायदा त्याला घेता आलेला नाही. (GT vs MI Qualifier 2)

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन :

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, कुमार कार्तिकेय आणि आकाश मधवाल.

इम्पॅक्ट खेळाडू : कुमार कार्तिकेय, अर्शद खान, विष्णू विनोद, ट्रिस्टन स्टब्स आणि रिले मेरेडिथ.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन :

हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, दासून शनाका/अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, यश दयाल आणि नूर अहमद.

इम्पॅक्ट खेळाडू : दर्शन नळकांडे, साई सुदर्शन, शिवम मावी, अल्झारी जोसेफ आणि साई किशोर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news