Bhopal News : ‘थ्री इडियट’ ची होईल आठवण, आजोबांना बाईकवरून नेले थेट आयसीयुत

Bhopal News
Bhopal News

भोपाळ ः एखाद्या चित्रपटातील द़ृश्य तुमच्या मनावर कायमचे कोरले जाते आणि कधी तरी वास्तवातही आपल्याला तशीच घटना पाहायला मिळते. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात घडलेला हा प्रसंग आमीर खानच्या 'थ्री इडियट' मधील एका द़ृश्याची आठवण करून देतो.  ( Bhopal News )

संबंधित बातम्या 

झाले असे की, नीरज गुप्ता नावाच्या व्यक्तीचे आजोबा आजारी पडले. त्यामुळे नीरजने त्यांना आपल्या बाईकवर बसवले आणि थेट त्यांना हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात नेले. यावेळी मागे बसलेल्या अन्य एकाने आजोबांना आधार दिला होता. मात्र, गंमत अशी की, नीरजने त्यांना बाईकवरून खाली उतरवलेच नाही. बाईकच त्याने अतिदक्षता विभागात नेली.

यानंतर तिथे असलेले अन्य रुग्ण हादरले. त्यामुळे उपस्थित डॉक्टरांनी कडक शब्दांत नीरजची हजेरी घेतली. त्यानंतर लगेच नीरजने तेथून पोबारा केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. ( Bhopal News )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news