राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पुन्हा शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान

भगतसिंह कोश्यारी
भगतसिंह कोश्यारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असे भगतसिंग कोश्यारी म्हणाले आहेत. कोश्यारी यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे.

राज्यपाल कोश्यारी एका कार्यक्रमात भाषण देताना म्हणाले, आम्ही जेव्हा शिकत होतो. हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होतो, तेव्हा शिक्षक आम्हाला विचारायचे की, तुमचा आवडता हिरो कोण? तुमचा आवडता नेता कोण? तेव्हा आमच्यापैकी काहींना सुभाषचंद्र बोस, कोणाला नेहरू तर कोणाला महात्मा गांधी आवडत होते. मला असे वाटते की, जर कोणी तुम्हाला विचारत असेल की, तुमचा आवडता हिरो कोण आहे? तर त्याला बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्हाला हे हिरो महाराष्ट्रातचं मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी सध्याच्या घडीबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला इथेच तुमचे हिरो मिळतील.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल कोश्यारी यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्वीट करत त्यांच्यावर निशाना साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले की, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अंदाधूंद बोलण्याचा विकार राज्याचे महामहिम राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांना जडला आहे. यापूर्वीही त्यांनी केलेल्या वक्तव्यातून राज्यातील सामाजिक शांतता भंग पाडण्याचे काम झालेच.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news