पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्याबाबत पत्र लिहिले आहे. यामध्ये निवृत्तीचे वय 60 वर्षे करावं आणि जुनी पेन्शन योजना सुरू करावी अशी मागणी केली आहे. कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या रखडल्या होत्या. आता राज्यातील कोरोनाचे संकट कमी होताना दिसून येत आहे, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे रखडलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी कर्मचारी संप करणार आहेत.
कर्मचाऱ्यांनी आपल्या पत्रात असे नमूद केले की, 2005 नंतर सेवेत रूजु झालेल्या कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना तसेच केंद्र सरकारची लागू झालेली नवीन पेन्शन योजना लागू करावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच याआधी महासंघाकडून पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला होता.
हे ही वाचलं का