Google Gemini AI : चॅटजीपीटीचा बाप, माणसापेक्षा हुशार ; गुगलने लाँच केले शक्तिशाली AI जेमिनी

Google Gemini AI : चॅटजीपीटीचा बाप, माणसापेक्षा हुशार ; गुगलने लाँच केले शक्तिशाली AI जेमिनी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जनरेटिव्ह AIमधील स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. यात सध्या तरी ChatGPTने आघाडी घेतली आहे, तर गुगल बार्ड ChatGPTचे थेट स्पर्धक आहे. गुगलने आता जेमिनी (Gemini) हे लार्ज लँग्वेज मॉडेल लाँच केले आहे. जेमिनी हे ChatGPTपेक्षा प्रभावी आणि शक्तिशाली असून गुगल बार्ड आता जेमिनी या मॉडेलवर चालणार आहे.

पण सध्या जेमिनी हे फक्त इंग्रजी भाषेपुरते मर्यादित आहे. हे मॉडेल १७० देशांत लाँच करण्यात आलेले आहे. एखादी बाब समजून घेणे, त्याचा अर्थ लावणे, कारणीमीमांसा करणे, कोडिंग, नियोजन करणे अशा क्षमता जेमिनीमध्ये आहेत. ज्या प्रमाणे मनुष्याची वर्तण आहे, तशाच प्रकारे जेमिनीचे काम असणार आहे. मानवी क्षमतांना मागे टाकू शकेल इतके जेमिनी प्रभावी आहे, असे सांगितले जाते, असे बिझनेस टुडेच्या बातमीत म्हटले आहे.

जेमिनी काय आहे? What is Gemini?

जेमिनी हे Large Language Model असून त्याची निर्मिती गुगलच्या डीपमाईंड या विभागाने केली आहे. चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी आणि त्यापेक्षाही शक्तिशाली असेहे मॉडेल आहे.

जेमिनी कुठे वापरले जाईल? Google Gemini AI

जेमिनी तीन रुपांत उपलब्ध आहे. जेमिनी प्रो, जेमिनी नॅनो आणि अल्ट्रा. यातील जेमिनी प्रो गुगल बार्ड समवेत इंटिग्रेट करण्यात आले आहे. सध्या गुगल बार्डवर शब्द स्वरूपात संवाद साधून विविध कामे यात पूर्ण करता येतील. पण इतर प्रकारेही Generative AI वापरता येईल, असे आश्वासन गुगलने दिले आहे. जेमिनी हे मल्टिमोडल असणार आहे. म्हणजे फोटो, शब्द, व्हिडिओ आणि इतर सर्वच डेटा टाइप यात सपोर्ट होतील.

API उपलब्ध होणार

जेमिनीची निर्मितीसाठी गुगलने नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले आहे, याला पाथवे असे नाव देण्यात आलेले आहे. याचाच अर्थ असा की जेमिनी हे सर्वांत मोठे लँग्वेज मॉडेल आहे. आणि त्याचा वापर विविध पद्धतीने केला जाणार आहे.

जेमिनीचा काय परिणाम होईल? Google Gemini AI

एक उद्योग म्हणून विचार केला तर AIवर जेमिनीचा फार मोठा प्रभाव पडणार आहे. जेमिनी हे मॉडेल मल्टिमोडल असल्याचा दावा गुगलने केला आहे, त्यामुळे आपण जसा माणसांशी संवाद साधतो तसाच संवाद या मॉडेलमुळे शक्य होणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news